Join us  

Singham Again: 'बाजीराव सिंघम'ला मिळणार या अभिनेत्याची साथ, जाणून घ्या कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 3:59 PM

Singham Again : अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा हा सुपरस्टार कॅमिओ करताना दिसणार आहे.

अजय देवगण(Ajay Devgan)च्या 'सिंघम' (Singham Movie) या फ्रेंचाइजी चित्रपटाचा पहिला आणि दुसरा भाग प्रेक्षकांना खूप आवडला. आता या चित्रपटाचा तिसरा भाग 'सिंघम अगेन' (Singham Again) चर्चेत आहे. अजय देवगणचा हा चित्रपट दिवाळीत चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. दरम्यान, 'सिंघम अगेन' या चित्रपटाबाबत एक बातमी समोर आली आहे, ज्यावरून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचणार आहे. 

अलिकडेच अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या सेटवर पोहोचल्याची बातमी आली होती. यानंतर सलमान खान सिंघम अगेन या चित्रपटात कॅमिओ करणार असल्याची चर्चा होती. आता 'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, रोहित शेट्टी आणि अजय देवगण पुढील १० दिवस 'सिंघम अगेन' चित्रपटासाठी सलमान खानसोबत कॅमिओ शूट करतील. त्याचे मित्र रोहित शट्टी आणि अजय देवगण यांच्या विनंतीवरून सलमान खानने 'सिंघम अगेन' चित्रपटात कॅमिओ करण्यास होकार दिला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा क्रॉसओव्हर असल्याचेही सूत्राने सांगितले आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर तिसऱ्या भागात सलमान खान म्हणजेच चुलबुल पांडे अजय देवगण म्हणजेच बाजीराव सिंघमला भेटणार आहे.

सिंघम अगेनमध्ये दिसणार हे कलाकारसिंघम अगेनबद्दल बोलायचे तर दीपिका या चित्रपटात शक्ती शेट्टीच्या भूमिकेत दिसणार आहे, जी 'कॉप युनिव्हर्स'ची पहिली महिला आहे. या ॲक्शनने भरलेल्या चित्रपटात रणवीर पुन्हा सिंबाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर खान, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्याही भूमिका आहेत. 

टॅग्स :अजय देवगणसलमान खान