Join us

'सिंघम अगेन'ची रिलीज डेट पुढे ढकलली, अजय देवगणनं केलं कन्फर्म; यामागचं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 11:53 AM

Singham Again Movie : 'सिंघम अगेन' संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. हे वृत्त अभिनेता अजय देवगणने कन्फर्म केले आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी(Rohit Shetty)च्या 'सिंघम अगेन'(Singham Again Movie)ची चाहते उत्सुकतने वाट पाहत आहेत. या सिनेमातील एकेक स्टारकास्टचे लूक समोर येत आहे. अद्याप चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला नाही. किंवा रिलीज होण्याची चिन्हंही दिसली नाहीत. आता अजय देवगण(Ajay Devgan)ने यामागचं कारण सांगितलं आहे. त्याने कन्फर्म केले की, चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज होणार नाही. चित्रपट पूर्ण व्हायला आणखी थोडा वेळ लागणार आहे.

सिंघम अगेनची रिलीज डेट पुढे ढकलल्यामुळे चाहते निराश झाले आहेत. अजय देवगण म्हणाला की, चित्रपटाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि घाई घाईत कसाही चित्रपट रिलीज करायचा नाही आहे. यामुळे चाहतेदेखील निराश होऊ शकतात. 

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सची चाहत्यांना प्रतीक्षारोहित शेट्टीने 'सिंघम अगेन'च्या माध्यमातून एक संपूर्ण पोलिस विश्व निर्माण केले आहे. अजय देवगण व्यतिरिक्त अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ, करीना कपूर हे देखील या पोलीस विश्वाचा एक भाग असतील. रोहितने याआधी अजय देवगणसोबत सिंघम आणि सिंघम २ बनवला होता. तर रणवीर सिंगसोबत सिम्बा आणि अक्षय कुमारसोबत सूर्यवंशी बनवला होता. सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर, करीना सिंघम २ चा एक भाग होती, तर दीपिका पादुकोण प्रथमच पोलिस अधिकारी म्हणून एन्ट्री करत आहे. रोहित शेट्टीच्या या कॉप युनिव्हर्समध्ये अर्जुन कपूर 'सिंघम अगेन'चा सुपर खलनायक असेल. मात्र, आता अजय देवगणच्या 'खेल खेल में'ची रिलीज डेट १५ ऑगस्ट देण्यात आली आहे. जॉन अब्राहमचा 'वेद' आणि शर्मन जोशीचा 'जिद्दी सनम' रिलीज होणार आहेत. आता सिंघम अगेन कधी प्रदर्शित होणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :अजय देवगण