Singham Again Release On Ott : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ वाढली आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ओटीटीवर कधी येतो, याची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच OTT प्लॅटफॉर्मवर अजय देवगण स्टारर 'सिंघम अगेन' हा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला आहे. थिएटरमध्ये 1 नोव्हेंबरला रिलीज झालेला रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' आता चाहते घरबसल्या पाहू शकतील.
रोहित शेट्टीचा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला आहे. प्राइम व्हिडीओचे सबस्क्रिप्शन असूनही तो मोफत पाहता येणार नाही. त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागणार आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर रेंट देऊन पाहता येईल. रोहित शेट्टीने 'सिंघम अगेन'मधून अख्खं बॉलिवूडच मोठ्या पडद्यावर उतरवलं. अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या सिनेमात अंकित मोहन, भाग्या नायर हे मराठी कलाकारही झळकले आहेत.
रोहित शेट्टी दिग्दर्शित मल्टीस्टारर सिंघम अगेन बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 सोबत बॉक्स ऑफिसवर झालेली टक्कर अजय देवगणला चांगलीच महागात पडली. सिंघम अगेनच्या कथेबद्दल सांगायचं तर त्यात आधुनिक रामायण दाखवण्यात आलं आहे. अर्जुन कपूरनं करीना कपूरचं अपहरण कसं केलं? त्यानंतर अजय देवगण त्याच्या संपूर्ण टीमसोबत करीनाला वाचवण्यासाठी जातो. हा चित्रपट ॲक्शन आणि कॉमेडीने परिपूर्ण आहे.