Join us

'सिंघम अगेन' vs 'भूल भूलैय्या ३' बॉक्स ऑफिस कलेक्शन! प्रेक्षकांची जास्त पसंती कोणत्या सिनेमाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 10:06 AM

'सिंघम अगेन' vs 'भूल भूलैय्या ३' या दोन सिनेमांपैकी कोणी पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बाजी मारली? (singham again, bhool bhulaiyya 3)

'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' हे दोन सिनेमे काल एकाच दिवशी रिलीज झाले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या सिनेमांची सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच हवा आहे.  'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' हे दोन सिनेमे एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाल्याने त्यांच्यात तगडी टक्कर आहे यात शंका नाही. दरम्यान 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' या सिनेमांचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. यामध्ये कोणत्या सिनेमाने बाजी मारलीय जाणून घेऊ.

'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३'चा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

लेटेस्ट बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' पैकी कोणत्या सिनेमाला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळालीय हे बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार पाहायला मिळेल. 'सिंघम अगेन'ने पहिल्या दिवशी ४३.५० कोटींची बंपर ओपनिंग केलीय. तर दुसरीकडे कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३' सिनेमाने पहिल्या दिवशी ३३.२७ कोटींची कमाई केलीय. अशाप्रकारे पहिल्या दिवशी तरी प्रेक्षकांनी 'भूल भूलैय्या ३'पेक्षा 'सिंघम अगेन'ला जास्त पसंती दिलीय, असं चित्र दिसतंय. 

'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३'चं नुकसान? 

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' या सिनेमांवर सौदी अरब देशामध्ये बंदी घालण्यात आलीय. 'भूल भूलैय्या ३' सिनेमात कार्तिक आर्यन जी भूमिका साकारतोय त्यात समलैंगिकतेचा उल्लेख आहे. तर  'सिंघम अगेन' सिनेमात हिंदू-मुस्लिम तणावाची झलक बघायला मिळतेय. या विषयांच्या पार्श्वभूमीवर 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' या सिनेमांना सौदी अरबमध्ये बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे या दोन सिनेमांना मोठा फटका बसणार आहे.

टॅग्स :अजय देवगणकार्तिक आर्यनभूल भुलैय्या