Join us

'सिंघम' फेम काजल अग्रवालने दिला गोंडस बाळाला जन्म, अभिनेत्रीवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 17:31 IST

Kajal Aggarwal: 'सिंघम' फेम अभिनेत्री काजल अग्रवाल आई झाली आहे

सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आई झाली आहे. होय, अभिनेत्रीने पती गौतम किचलूसोबत तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे. काजल अग्रवालला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे. याबद्दलची माहिती काजल किंवा गौतमने दिलेली नसून एका वेबपोर्टलच्या इंस्टा पेजवर ही माहिती देण्यात आली आहे.काजल अग्रवालने ३० ऑक्टोबर २०२० रोजी मोठ्या थाटामाटात बिझनेसमन गौतम किचलू सोबत लग्न केले. लग्नानंतर, काजलने १ जानेवारी २०२२ रोजी प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले. आता अभिनेत्री आई झाली आहे. 

खरेतर ‘बॉलीवूड बबल’च्या रिपोर्टनुसार, काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांनी बाळाचे स्वागत केले आहे. दोघेही पहिल्यांदा आई वडील झाल्यामुळे खूप खूश आहेत. अद्याप या वृत्ताला काजल आणि गौतम यांनी दुजोरा दिलेला नाही.

फेब्रुवारी महिन्यात काजल अग्रवालची डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. डोहाळे जेवणावेळी काजलने पिंक रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. साडीसोबत मॅचिंग ब्लाउज आणि ट्रेडिशनल ज्वेलरी तिने घातले होते. तर गौतम किचलूने कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेट परिधान केले होते.

काजल आणि गौतम यांच्या लग्नाबद्दल सांगायचे तर, ३० ऑक्टोबर २०२० रोजी दोघांनी एका खाजगी समारंभात लग्न केले. या लग्नात दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक सहभागी झाले होते. गौतम आणि काजल यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. दोघांची मैत्री झाली आणि बघता बघता या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये दोघांनाही आयुष्य एकत्र घालवायचे ठरवले. लग्न करून दोघांनी कायम सोबत राहण्याचे वचन दिले. काजल अग्रवाल गेल्या काही काळापासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. आता ती तिचा पूर्ण वेळ आपल्या मुलाला देणार आहे.

टॅग्स :काजल अग्रवाल