शाहरूख, सलमानसोबत काम करणा-या आणि एकेकाळी आघाडीची नायिका म्हणून ओळखल्या जाणा-या अभिनेत्रीला कालांतराने यशाने अशी काही हुलकावणी दिली की, बॉलिवूडला तिने कायमचा रामराम ठोकला. आम्ही बोलतोय ते ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातील अभिनेत्रीबद्दल. प्रिया गिल हे तिचे नाव. निरागस चेह-याच्या प्रियाचा ‘सिर्फ तुम’ सुपरडुपर हिट झाला.
खरे तर पहिला चित्रपट ‘तेरे मेरे सपने’ हाही सुपरहिट होता. पण पहिल्या चित्रपटाच्या रिलीजनंतर चार वर्षांनी आलेल्या ‘सिर्फ तुम’ या चित्रपटाने प्रियाला खरी ओळख दिली. ‘सिर्फ तुम’च्या यशाने प्रिया गिल अचानक चर्चेत आली. पण हे यश फार काळ टिकले नाही.
1995 साली मिस इंडिया फायनलिस्ट राहिलेल्या प्रियाने 1996 साली ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. कमी बजेटचा हा सिनेमा सुपरहिट ठरला. यानंतर 1998 साली ‘शाम घनश्याम’ या चित्रपटात प्रिया झळकली. पण या चित्रपटाला फार यश मिळू शकले नाही.
सलमान खान, नागार्जुन, सुष्मिता सेन, संजय कपूर अशा अनेकांसोबत प्रियाने काम केले. 19 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘जोश’मध्ये ती शाहरूखची हिरोईन बनली. ( या चित्रपटात ऐश्वर्या राय सारख्या अभिनेत्रीला शाहरूखच्या बहिणीची भूमिका साकारली होती. यावरून प्रियाची लोकप्रियता लक्षात यावी.)
या पश्चात ‘बडे दिलवाला’ यात प्रियाची वर्णी लागली. पण या चित्रपटानंतर तिच्या फिल्मी करिअरला ओहोटी लागली. पुढे तर साईड हिरोईन इथपर्यंतच तिची ओळख मर्यादीत झाली.
‘एलओसी’ या सिनेमात प्रिया अखेरची झळकली. पण तोपर्यंत प्रिया गिलची जादू पुरती ओसरली होती. यामुळे प्रियाने बॉलिवूडमध्ये सोडून साऊथकडे मोर्चा वळवला. ‘मेघम’ हा मल्याळम सिनेमा तिने साईन केला. पंजाबी सिनेमातही तिने काम केले. अखेरिस भोजपुरी सिनेमे करण्याची वेळी तिच्यावर आली. यानंतर मात्र ती जणू गायब झाली.