Join us

एक दिवस नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील; शकुंतलादेवींची भविष्यवाणी खरी ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 12:40 PM

शकुंतला देवींच्या अफाट बुद्धिमत्तेची प्रचिती सर्वांना त्या लहान असतानाच अनेकांना आली. मोठमोठी आकडेवारी त्या अगदी चुटकीसरशी तोंडी सोडवत असत.

रुपेरी पडद्यावर बायोपिकचा ट्रेंड चांगलाच सुपरहिट ठरला आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरील सिनेमा रसिकांना विशेष भावला आहे. मेरी कोम, मिल्खा सिंग, महेंद्रसिंह धोनी, संजय दत्त, सनी लिओनी असे एक ना अनेक व्यक्तींच्या जीवनावरील बायोपिक रसिकांची दाद मिळवून गेले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला शकुंतला देवी हा  बायोपिकला रसिकांनी पसंती दिली. 'मानवी कम्प्युटर' म्हणून  शकुंतला देवी ओळखल्या जातात.  शकुंतला देवी यांच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिकेत झळकली. सिनेमामुळे शकुंतला देवी चर्चेत आल्या. मात्र आता आणखीन एक खास कारणामुळे शकुंतला देवी यांच्यावर चर्चा रंगत आहे.  

शकुंतला देवींच्या अफाट बुद्धिमत्तेची प्रचिती सर्वांना त्या लहान असतानाच अनेकांना आली. मोठमोठी आकडेवारी त्या अगदी चुटकीसरशी तोंडी सोडवत असत. १९८२ साली गिनीज बुक ऑफ रेकॅार्डने त्यांच्या कामाची दखल घेतली होती.  शकुंतला देवींचा जीवनप्रवास जगाला थक्क करणारा आहे.

शकुंतला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ही एक भविष्यवाणी केली होती. एक दिवसी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील असं शकुंतला देवी यांनी भविष्यवाणी केली होती. शकुंतला देवी यांनी अखेरच्या दिवसात केलेले  भाकित नक्कीच आशादायी  होते. आणि  अगदी तसंच घडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. परंतु, हे पाहायला शकुंतला देवी हयात नाहीत.  याविषयीची माहिती त्यांचा जावई अजय अभय कुमारने लिहीलेल्या एका लेखात हे लिहीले आहे. २०१३ मध्ये शकुंतला देवी यांनी अखेरचा श्वास घेतला. 

टॅग्स :नरेंद्र मोदी