Join us

"त्याने नखांमध्ये ब्लेड लपवलं होतं इतक्यात.."; अक्षय कुमारने सांगितला चाहत्याचा थरारक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 18:02 IST

अक्षय कुमारने त्याच्या चाहत्याचा अंगावर काटा आणणारा एक किस्सा मुलाखतीत सांगितला. काय म्हणाला अक्षय?

अक्षय कुमारचे जगभरात अनेक चाहते आहेत. अक्षय कुमारचे गेले काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत आहेत. पण अक्षयच्या फॅन फॉलोईंगमध्ये अजिबात कमी झालेली दिसत नाही. अक्षय कुमारचा आगामी 'स्काय फोर्स' हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच अक्षयने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या माथेफिरु चाहत्याचा अजब किस्सा सांंगितला.

अक्षयच्या चाहत्याच्या हातात ब्लेड होता अन्..

अक्षय कुमारने रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या पॉडकास्टमघ्ये हा खास किस्सा सांगितला होता. अक्षय म्हणाला की, "एकदा प्रचंड गर्दीमध्ये मी माझ्या चाहत्यांची भेट घेत होतो. तेव्हा एका चाहत्याला हात मिळवल्यावर मी दुसऱ्या एका चाहत्याला हात मिळवला. मला जाणवलं की माझा हात रक्तबंबाळ झालाय. मी जेव्हा एका चाहत्याला हात मिळवला तेव्हा त्याने नखांमध्ये ब्लेडचा तुकडा लपवला होता. हेच ब्लेड त्याने हात मिळवताना मला मारलं अन् माझ्या हातातून रक्त आलं. याची जाणीव मला थोड्यावेळाने झाली. "

अक्षयच्या 'स्काय फोर्स'ची उत्सुकता

अक्षय कुमारच्या आगामी 'स्काय फोर्स' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात अक्षयसोबत वीर पहारिया प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय सारा अली खान आणि निम्रत कौर यांचीही सिनेमात प्रमुख भूमिका आहे. 'स्काय फोर्स' सिनेमा प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर अर्थात २४ जानेवारी २०२५ ला रिलीज होतोय. अक्षय या सिनेमात एअर फोर्स अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सत्य घटनेवर आधारीत हा सिनेमा आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड