बॉलिवूडमधील दोन स्टार किड्स लग्नाच्या बेडीत अडकले. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा विवाह अतिशय थाटात पार पडला. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता दोघांनी आपले नाते अधिकृत केले आहे. वास्तू बंगल्यात दोघेही विवाहबद्ध झाले. . लगीनगाठ बांधल्यानंतर आलियानं रणबीरसोबतचे फोटो शेअर केले. त्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत, सगळ्यांनीच नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांनीही आलिया भटने पोस्ट केलेल्या लग्नाच्या फोटोवर कमेंट केली आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. त्या स्वत:चे आणि विविध फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्राम ट्विटरवर पोस्ट करत असतात. त्याच प्रमाणे त्या बॉलिवूड सेलेब्सच्या फोटोंवर देखील कमेंट करत असतात. नुकतंच त्यांनी आलिया आणि रणबीरच्या फोटोंवर कमेंट केली आहे. स्मृती इराणींने लिहिले, अभिनंदन. देव तुमचे भले करो. स्मृती इराणी यांची ही कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आलियानं लग्नानंतरच्या आपल्या पहिल्या पोस्टमध्ये काय लिहिलं? आलियाने रणबीर कपूर सोबतचे लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आलियाने पोस्टमध्ये लिहिले, आज आपली फॅमिली आणि मित्रांच्या साक्षीने घरीच आमच्या फेव्हरिट स्पॉटवर - ती बालकनी जेथे आमच्या रिलेशनशिपची 5 वर्षे गेली - आज आमचे लग्न झाले. अनेक गोष्टी मागे सोडत, आम्ही एकत्रितपणे आणखी आठवणी बनविण्याची वाट पाहू शकत नाही. आठवणी ज्या आनंद, प्रेम, मूव्ही नाईट्स, सिली फाईट्स, वाईन डिलाइट्स, चायनीज बाइट्सने भरलेल्या आहेत. याशिवाय, आलियाने तिच्या पोस्टमध्ये चाहत्यांच्या प्रेमाबद्दल त्यांचेही आभार मानले आहेत.