म्हणून ‘झी अॅक्शन’वर जबरदस्त अॅक्शनपट‘घायल वन्स अगेन’चे प्रसारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 11:49 AM
सनी देओल पुन्हा परत आला आहे आणि यावेळी तो दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून ठोसे लगावतो आहे. 1990 मधील ‘घायल’ या ...
सनी देओल पुन्हा परत आला आहे आणि यावेळी तो दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून ठोसे लगावतो आहे. 1990 मधील ‘घायल’ या विलक्षण गाजलेल्या चित्रपटाचा पुढील भाग असलेल्या ‘घायल, वन्स अगेन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन चक्क सनी देओलने केले असून त्याची निर्मिती धर्मेंद्रने केली आहे. सर्व अॅक्शन चित्रपटांचे एकमेव स्थान असलेल्या ‘झी अॅक्शन’ वाहिनीवर रविवार, 6 मे रोजी दुपारी 2.15 वाजता ‘शनिवार फाइट क्लब’ या मालिकेअंतर्गत या चित्रपटाचे प्रसारण केले जाईल. श्रीमंतवर्गाकडून केला जाणारा सत्तेचा दुरुपयोग आणि भ्रष्टाचाराविरोधात लढताना आजच्या पिढीपुढे असलेल्या आव्हानांवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपटात सनी देओल प्रमुख भूमिकेत असून ओम पुरी,सोहा अली खान आणि तिस्का चोप्रा हे सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत.अजय मेहरा (सनी देओल) हा तरुण श्रीमंत उद्योगपती बलवंतराय (अमरीश पुरी) यांची हत्या करतो आणि प्रामाणिक पोलिस निरीक्षक ज्यो डिसुझा (ओम पुरी) यांच्यापुढे शरणागती पत्करतो. त्या गुन्ह्याची शिक्षा भोगून सुटल्यावर अजय स्वत: एक वृत्तपत्र सुरू करतो आणि शोधपत्रकारितेत आपले नाव निर्माण करतो. माहिती अधिकाराचा वापर करून सत्यशोधन करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने अजय सामाजिक गुन्ह्यांविरोधात निर्भय बातमीपत्रे प्रसिध्द करीत असतो, ज्यामुळे त्याची लोकप्रियता वाढत असते. त्याच्या चाहत्यांमध्ये चार तरूण मुलांचा समावेश असतो, ज्यांना पूर्वी अजयनेच आपल्या हस्ते शौर्यपुरस्कार प्रदान केलेले असतात. हे तरूण छायाचित्रांच्या एका प्रदर्शनाचे आयोजन करतात, आणि त्यावेळी त्यांच्या हातून एक खून होत असतानाचे छायाचित्र घेतले जाते. हा पुरावा अतिशय सनसनाटी असतो कारण त्या खुनात शहरातील दोन अत्यंत श्रीमंत व प्रभावशाली व्यक्ती गुंतल्याचे स्पष्ट दिसते. त्या मुलाविरोधात सज्जड पुरावा चार तरुणांकडे असतो,पण तो पुरावा न्यायालयात सादर करणे वाटते तितके सोपे नसते. भ्रष्ट आणि शक्तिशाली विरुध्द सत्यनिष्ठ सामान्य तरुणांच्या या लढाईत कोणाचा विजय होतो? ज्योच्या खुन्याला न्यायापुढे आणण्यात अजय यशस्वी होतो का?हे पुन्हा एकदा रसिकांना या सिनेमातून अनुभवता येणार आहे.