म्हणून अजय देवगनने घेतले नाही मानधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 12:33 PM
गोलमाल अगेन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतो आहे. रिलीजनंतर पाच दिवसांनी चित्रपटाची कमाई सुरुच आहे. पहिल्या चार ...
गोलमाल अगेन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतो आहे. रिलीजनंतर पाच दिवसांनी चित्रपटाची कमाई सुरुच आहे. पहिल्या चार दिवसांत दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या गोलमालने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर २४ तासांपेक्षा कमी वेळात २० दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिला असल्याचा विक्रम या चित्रपटाने नोंदवला आहे. आमिर खानच्या सीक्रेट सुपरस्टारला ही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कडी टक्कर दिली होती. मात्र आता आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती ऐकून कदाचित तुम्हाला आश्चार्य वाटेल. बॉक्स ऑफिसवर कोटींची उड्डाण घेणाऱ्या या चित्रपटासाठी अजय देवगण एक रुपयाही मानधन घेतले नव्हते. तर त्यांने चक्क गोलमाल अगेनचे प्रसारणाचे अधिकार विकत घेतले आहेत. ‘गोलमाल’ सीरिजमधला हा चौथा चित्रपट असून, सर्वांत जास्त खर्च रोहितने या चित्रपटासाठी केला आहे. यातील दृश्यं, सिनेमॅटोग्राफी पाहून प्रेक्षकांना याचा अंदाज सहज येऊ शकतो. यावर्षीचा सुपरहिट ठरत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ८० टक्के आॅक्यूपेन्सी रेटही नोंदवला होता. शाहरूखच्या ‘रईस’चा विक्रम मोडून. म्हणजेच, पहिल्या दिवशीच्या आॅक्यूपेन्सी रेटच्याबाबतीत ‘रईस’ला ‘गोलमाल अगेन’ने मागे टाकले आहे. ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमु, तुषार कपूर, जॉनी लिव्हर, परिणीती चोप्रा या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. यात तब्बू आणि परिणीती चोप्रा पहिल्यांदाच दिसतायेत. गोलमालच्या आतपर्यंतचे तीन ही भाग बॉक्स ऑफिसवर सुपरहिट गेले आहेत आणि चौथा भाग ही बॉक्स ऑफिसवर धमाकूळ घालतो आहे. नाना पाटेकर यांच्या फॅन्सना तर या चित्रपटात खूप चांगले सरप्राइज मिळाले आहे. खरंतर, चित्रपटांच्या बाबतीत हे वर्ष फारसं सकारात्मक ठरलं नाही. ‘ट्युबलाइट’, ‘शेफ’, ‘जग्गा जासूस’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘सिमरन’ असे चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटले. तर दुसरीकडे ‘गोलमाल अगेन’ मात्र कमाईच्या बाबतीत यशस्वी ठरतोय आणि अजूनही नवे रेकॉर्ड बॉक्स ऑफिसवर प्रस्थापित करेल.