तर या कारणामुळे तैमूरच्या पहिल्या बर्थ डेला आले नाहीत सारा अली खान आणि इब्राहिम खान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 7:54 AM
नुकताच करिना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खानने आपला वाढदिवस साजरा केला आहे. तैमूरचा पहिला ...
नुकताच करिना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खानने आपला वाढदिवस साजरा केला आहे. तैमूरचा पहिला वाढदिवस पतौडी पॅलेसमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तैमूरचा पहिलाच वाढदिवस असल्याने संपूर्ण पतौडी पॅलेस लाइटिंगने झगमगाटून निघाले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण खान आणि कपूर कुटुंबीय हजर होते. मात्र या सगळ्यात सैफची मुलगा इब्राहिम आणि सारा यात पार्टीत कुठे दिसले नाहीत. दोघ आपल्या लहान भावाच्या आनंदाचा हिस्सा बनू शकले नाही. मात्र या मागचे कारण काय असू शकले. तर आम्ही तुम्हाला सांगतो, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या सारा अली खान केदारनाथच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. नुकताच तिने चित्रपटाच्या शूटिंगचे दुसरे शेड्यूल पूर्ण केले. या कारणामुळे ती आपल्या लहान भावाच्या बर्थ डे पार्टीचा हिस्सा बनू शकली नाही. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार सारा आपल्या क्रू बरोबर चित्रपटातील आपल्या भूमिकेची तयारी करते आहे. ती सतत दोन आठवडे ती केदारनाथच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तैमूरचा वाढदिवस 20 डिसेंबरला होता त्यावेळी तिची शूटिंग संपायला दोन दिवस बाकी होते. तिच्या दिग्दर्शकाची इच्छा होती की तिने वर्कशॉपमध्ये थांबवे म्हणून साराला तिथेच थांबली. तर इब्राहिमबदल बोलायचे झाले तर त्याला आपली आई अमृता सिंगसोबत क्वालिटी टाईम स्पेंट करायचा होता. सूत्रांच्या माहितीनुसार इब्राहिम क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये घरी आला होता. तो लंडनमध्ये आपले शिक्षण पूर्ण करतो आहे.व्हकेशनसाठी तो मुंबईत आला होता. त्यांने हा वेळ आपली आई आणि बहिणीसोबत घालवण्याचा निर्णय घेतला. सारा आणि इब्राहिम सैफ आणि करिनाच्या खूप जवळ आहेत. ALSO READ : Christmas Party: ख्रिसमस पार्टीत पोहोचला तैमूर अली खान, मॉम -डॅडसोबत दिली झक्कास पोज!करिनाची न्युट्रिशियन ऋजुता दिवेकर हिने मुंबईपासून ५० किमी दूर सोनावेमधील एक लहानसे जंगल तैमूरला भेट दिले आहे. ऋजुताने स्वत: इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली आहे. सोबत तैमूर अली खान पतौडी जंगलाचा एक खास फोटोही शेअर केला होता. तैमूरला भेट म्हणून मिळालेले जंगल १००० चौरस फूट जमिनीवर पसरलेले आहे. यात १०० वेगवेगळी झाडं लावण्यात आली आहेत.