Join us

... म्हणून शाहरुखने सांगितला 'डंकी'चा अर्थ; चाहत्यांसाठी चित्रपटातील गाणंही आलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 8:44 AM

राजकुमार हिरानींच्या 'डंकी' सिनेमात पहिल्यांदाच शाहरुख खान त्यांच्यासोबत काम करत आहे.

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानसाठी (Shahrukh Khan)यंदाचं २०२३ हे वर्ष फारच खास ठरलंय. ४ वर्षांच्या ब्रेकनंत त्याने यावर्षाच्या सुरुवातीलाच 'पठाण' सिनेमातून धुमाकूळ घातला. त्यानंतर, काहीच महिन्यात 'जवान' मधूनही तो चाहत्यांच्या भेटीला आला. शाहरुखच्या जवान चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. आता, यंदाच्या वर्षातील त्याचा अखेरचा चित्रपट 'डंकी' २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र, या सिनेमाच्या नावावरुन बराच गोंधळ आणि चर्चा होत आहे. त्यामुळे, आता स्वत: शाहरुख खानने डंकीचा अर्थ सांगितलं आहे. 

राजकुमार हिरानींच्या 'डंकी' सिनेमात पहिल्यांदाच शाहरुख खान त्यांच्यासोबत काम करत आहे. गेल्यावर्षीच हिरानी आणि शाहरुखने एका मजेशीर जाहिरातीतून या सिनेमाची घोषणा केली होती. शाहरुखच्या ५८ व्या वाढदिवस दिनी 'डंकी' सिनेमाचा पहिला टीझर रिलीज करण्यात आला होता. 

चार मित्र ज्यांना लंडनला जायचं असतं मात्र अनेक अडचणी येत असतात. शाहरुख खान या मित्रांना लंडनला पाठवण्यासाठी धडपडत असतो. या चार मित्रांमध्ये तापसी पन्नू आणि विकी कौशल यांचा समावेश आहे. सिनेमा नक्की काय असणार आहे हे तर टीझरमधून थोडंफार स्पष्ट होतंय. पण, सिनेमाच्या नावाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यामुळे, शाहरुखनेच आता तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर दिलंय. शाहरुखने ट्विट करुन चित्रपटाली गाण्याचं प्रमोशनल गाणं शेअर केलं आहे. तसेच, डंकी या शब्दाचा अर्थही किंग खानने सांगितला आहे.

सगळेच विचारत आहेत, म्हणून सांगतोय, डंकीचा अर्थ असा आहे, आपल्या लोकांपासून दूर राहणे. आणि जेव्हा आपले जवळ असतात, तेव्हा असं वाटतं की 'कयामत'पर्यंत आपण त्यांच्याजवळच राहावं, असे शाहरुखने म्हटले आहे. तसेच, ओ माही.. ओ माही... ह्या गाण्याचा प्रोमो शेअर करत सूर्यास्तापूर्वी या गाण्याचा आनंद घ्या, असेही किंग खानने म्हटलं आहे. 

चित्रपटाशी निगडीत डंकीचा असाही अर्थ 

डंकी नावाचा अर्थ हा डंकी (डॉन्की) फ्लाईटशी आहे. हा पंजाबी शब्द आहे. म्हणजेच जेव्हा एखाद्याला परदेशात जायचे असेल पण त्याला कायदेशीर पद्धतीने जाता येत नाही. तेव्हा ते अनधिकृतरित्या चालतच निघतात. त्याला 'डंकी फ्लाईट' असं म्हटलं जातं. हा प्रकार मधल्या काळात खूपच चर्चेत आला होता. अनेक तरुण डंकी फ्लाईटद्वारे कॅनडा आणि युएस मायग्रेट करतात. शाहरुखचा सिनेमा याच विषयावर आधारित असल्याचं दिसून येतं. वाळवंटात काही लोक लाइनने पाठीवर ओझं घेऊन जात आहेत आणि त्यांच्यावरून एक विमान जात आहे, असा सिनेमाचा प्रोमो आपण यापूर्वीच पाहिला आहे. 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडडंकी' चित्रपटट्विटर