Join us

तर या कारणामुळे अभिषेक बच्चनने सोडला पलटन चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 10:40 AM

जे पी दत्ताच्या पलटन चित्रपटातून अभिषेक बच्चनचे एक्झिट घेतली या बातमीची चर्चा बी टाऊनमध्ये खूप झाली. हा चित्रपट अभिषेकने ...

जे पी दत्ताच्या पलटन चित्रपटातून अभिषेक बच्चनचे एक्झिट घेतली या बातमीची चर्चा बी टाऊनमध्ये खूप झाली. हा चित्रपट अभिषेकने वैयक्तिक कारणारमुळे सोडल्याची चर्चा होती. मात्र यामागचे खरं कारण अजूनपर्यंत समजू शकले नव्हते.  मात्र बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार आता यामागचे कारण स्पष्ट झाले आहे. अभिषेकसोबत या चित्रपटात सोनू सूद आहे मात्र अभिषेकपेक्षा जास्तवेळ पडद्यावर सोनू सूद दिसणार आहे. या संदर्भात अभिषेक जे. पी दत्ताशी बोललासुद्धा मात्र जे पी. दत्त काही ऐकायच्या मूडमध्ये दिसले नाही. त्यामुळे अभिषकने हा चित्रपच अर्धवट सोडण्यातच शहाणपण वाटले आणि त्यांने हा चित्रपट सोडून दिला. अभिषेक बच्चन याच्या करिअरची सुरुवात फार काही खास झाली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून अभिषक बच्चन चित्रपटात झळकलाच नाही आहे. ALSO READ :  म्हणून अभिषेक बच्चनची हिरोईन बनण्यास प्रियांका चोप्राने दिला नकार?मात्र लवकरच तो बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीला लागला आहे. अभिषेकने ‘रॉ’ चित्रपट साईन केला आहे. यात तो रॉ एजन्टच्या भूमिकेत दिसेल. बंटी वालियाची पत्नी वानेसा वालिया हा चित्रपट प्रोड्यूस करते आहे. बंटी वालिया व अभिषेक जुने मित्र आहेत. त्याने अभिषेकला स्क्रिप्ट ऐकवली. अभिषेकला ती आवडली आणि त्याने हा चित्रपट साईन केला. यापूर्वी या चित्रपटासाठी सुशांत सिंहचे नाव फायनल झाले होते. पण सुशांतच्या तारखांचा मेळ जमत नसल्याने ऐनवेळी त्याने या चित्रपटास म्हणे नकार दिला. सुशांत सध्या ‘केदारनाथ’मध्ये बिझी आहे. त्यामुळे सुशांत आऊट झाला अन् अभिषेक इन झाला.अभिषेकचा हा नवा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित असल्याचे कळते. यात अभिषेक जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसेल. यासाठी अभिषेकला बॉडी फिट घेण्याचीही गरज पडू शकते. एकंदर काय तर अभिषेक ब-याच महिन्यांनंतर काहीतरी करताना दिसेल.  गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाचा रिमेक बनणारा असल्याच्या अनेक चर्चा झाल्या होत्या मात्र तामिळ छायाचित्रकार-दिग्दर्शक राजीव मेनन यांनी या चित्रपटाचा रिमेक बनवण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच  अभिमानच्या रिमेकमध्ये सुद्धा ऐश्वर्या अभिषेकची जोडी दिसणार असल्याची चर्चा आहे.