रितेश देशमुख व जेनेलिया डिसूजा म्हणजे बॉलिवूडचे क्यूट कपल. 2012 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. खरे तर रितेश व जेनेलिया एकमेकांवरचे प्रेम, एकमेकांबद्दलचा आदर व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. पण रविवारी दोघांमधील ‘भांडण’ चव्हाट्यावर आले. होय, रविवारी रितेशने एक फोटो ट्वीट केला. विशेष म्हणजे, यात त्याने जेनेलियालाही टॅग केले.
‘प्रत्येक रूसलेल्या स्त्रीमागे एक पुरूष असतो. पण त्याची काय चूक झाली, हे त्या बिचा-याला ठाऊक नसते,’असे रितेशने शेअर केलेल्या या फोटोवर लिहिले होते.
जेनेलिया आणि रितेशच्या प्रेमप्रकरणाला तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच सुरुवात झाली. या चित्रपटाचे चित्रीकरण हैद्राबादमध्ये सुरू असल्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांनी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला होता. चित्रीकरण संपल्यावर मुंबईत परतल्यावर ते दोघे एकमेकांना मिस करू लागले. एकमेकांना भेटण्याची ते संधीच शोधत असत. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्या दोघांना देखील कळले नव्हते.
रितेश व जेनेलियाच्या ट्वीटवर नेटिझन्सच्या मजेशीर प्रतिक्रिया...पाहाच...