बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान(Soha Ali Khan)चा 'छोरी २' (chhori 2 Movie) हा हॉरर चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर आला आहे. नुसरत भरुचाने यात मुख्य भूमिका साकारली आहे. अलिकडेच सोहा अली खानने तिच्या कुटुंबाला एका रात्रीत घर कसे रिकामे करावे लागले याबद्दल एक भयानक कहाणी सांगितली.
मिर्ची प्लसला दिलेल्या मुलाखतीत, सोहा अली खानने भूत कथांवर चर्चा करताना सांगितले की, तिच्या कुटुंबाला एकदा काही अज्ञात शक्तीचा अनुभव आला होता. सोहाचे राजघराणे पूर्वी पिली कोठी नावाच्या वेगळ्या राजवाड्यात राहत होते. तिच्या पणजीला एका आत्म्याने कानशीलात लगावली होती, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने ताबडतोब घर सोडण्याचा निर्णय घेतला.
सोहा अली खानने सांगितला किस्साजेव्हा सोहा अली खानला विचारण्यात आले की तिने कधी अशा सेटवर काम केले आहे का जिथे भूत असल्याचे सांगितले जाते, तेव्हा तिने उत्तर दिले, 'मला सेटबद्दल माहिती नाही, पण मी तुम्हाला पतौडी येथील आमच्या घराबद्दल नक्कीच सांगू शकते.' पतौडी पॅलेसजवळ एक राजवाडा आहे, ज्याला पीली कोठी म्हणतात. आमचे कुटुंब तिथे राहत होते, पण एका रात्री त्यांनी अचानक त्यांचे सामान बांधले आणि पळून गेले. अशाप्रकारे ते पतौडी पॅलेसमध्ये स्थलांतरित झाले.
पीली कोठी आजही आहे रिकामीती पुढे म्हणाली की, हे किती खरे आहे हे मला माहित नाही, कारण मी त्यावेळी तिथे नव्हते. पण, असे सांगितले जाते की की माझ्या पणजीला भूताने कानशीलात मारली होती आणि तिच्या चेहऱ्यावर निशाण उठले होती. यामुळे त्यांना भीती वाटली आणि त्यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. सोहा अली खानने सांगितले की, पीली कोठी पतौडी पॅलेसच्या जवळ आहे आणि ते एक प्रमुख ठिकाण आहे. तरीही ती पिली कोठी आजही रिकामी आहे. ती म्हणते की लोक त्या ठिकाणी का राहत नाहीत, या मागे काहीतरी कारण असेल.
'छोरी २'मध्ये अभिनेत्रीने साकारली डेंजरस भूमिकासोहा अली खानने 'छोरी २' या हॉरर चित्रपटात दासी माँची भूमिका साकारली आहे. यातील तिच्या डेंजरस लूकची खूप चर्चा होत आहे. हा चित्रपट विशाल फुरिया यांनी दिग्दर्शित केला आहे. हा २०२१ मध्ये आलेल्या 'छोरी' चित्रपटाचा सीक्वल आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत दिसली आहे.