सलमान खानचं (salman khan) संपूर्ण कुटुंब काही ना काही कारणामुळे नेहमी चर्चेत असतं. सलमान खान सध्या त्याच्या 'सिकंदर' सिनेमामुळे चर्चेत आहे. अरबाज खान (arbaz khan) त्याची दुसरी पत्नी शूरासोबत इव्हेंटला हजेरी लावताना दिसतो. आता सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खान (sohail khan) चर्चेत आला आहे. घटस्फोनंतर सोहेल खान पुन्हा रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामागचं कारण म्हणजे काल मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध बंगळुरु जी मॅच झाली, त्यामध्ये सोहेलने एका तरुणीसोबत फोटोशूट केलं. त्यामुळे सोहेल पुन्हा रिलेशनशीपमध्ये आला आहे का, असा प्रश्न सर्वांना पडलाय.
सोहेल खानसोबत दिसणारी ती कोण
सोहेल खानने जिच्यासोबत फोटो काढले तिचं नाव शेफाली बग्गा. शेफाली आणि सोहेल काल IPL चा सामना पाहायला गेले होते. यावेळी संपूर्ण सामन्यादरम्यान शेफाली आणि सोहेल एकत्र दिसून आले. शेफाली बग्गा ही सुद्धा एक टीव्ही अभिनेत्री आहे. शेफालीने तिच्या सोशल मीडिया अकऊंटवर सोहेलसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून शेफाली आणि सोहेल हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत का, असा प्रश्न सर्वांना पडलाय? पण दोघांकडूनही अजून तसा काही खुलासा झाला नाहीये.
शेफाली बग्गा ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री असून तिने सलमान खानच्या बिग बॉस शोमध्येही सहभाग नोंदवला होता. बिग बॉसनंतर शेफाली बग्गाला खूप लोकप्रियता मिळाली. सोहेल खानबद्दल सांगायचं तर, तीन वर्षांपूर्वी सीमा सचदेवसोबत सोहेलचा घटस्फोट झाला होता. सोहेल खान सध्या सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये दिसतो. सोहेल शेवटचा आपल्याला सलमान खानसोबत 'ट्यूबलाईट' सिनेमात दिसला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन सोहेल खानने केलं होतं.