Join us

काही नापास, तर काही ढक्कलपास!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 9:52 AM

बॉलिवूड इंडस्ट्रीत नाव, ग्लॅमर झालं म्हणजे सगळं काही मिळवलं असं होत नाही. त्यांच्या चाहत्यांना कधी कधी त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींचे गुणही जाणून घ्यावेसे वाटतात. पण, तुम्हाला माहितीये का, तुमचे लाडके सेलिब्रिटी १२वीच्या परीक्षेत काही जण चक्क नापास, तर काही जेमतेम ढक्कलपास झाले होते.

बॉलिवूड इंडस्ट्रीत नाव, ग्लॅमर झालं म्हणजे सगळं काही मिळवलं असं होत नाही. त्यांच्या चाहत्यांना कधी कधी त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींचे गुणही जाणून घ्यावेसे वाटतात. पण, तुम्हाला माहितीये का, तुमचे लाडके सेलिब्रिटी १२वीच्या परीक्षेत काही जण चक्क नापास, तर काही जेमतेम ढक्कलपास झाले होते. दिव्यांका त्रिपाठी टीव्ही जगताची राणी दिव्यांका हिने १०वीत ६५ टक्के गुण मिळवले होते. तर १२ वीत तिने ७८ टक्के गुण मिळवले होते.कॅटरिना कैफकॅटरिना कैफचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. सात बहिणी आणि एक भाऊ असे कॅटरिनाचा मोठे कुटुंब होते. कॅटरिनाच्या आई-वडिलांच्या तिच्या लहानपणीच घटस्फोट झाला. त्यानंतर कॅटरिना आपल्या आईसोबत राहायला लागली. तिच्यावर घराची जबाबदारी असल्याने ती फार काही शिकू शकली नाही. पण, १२वीच्या परीक्षेत मात्र ती ढक्कलपास झाली होती. तिला केवळ ५७ टक्के मार्क्स होते.पूजा बॅनर्जी टीव्ही जगतातील अभिनेत्री पूजा बॅनर्जी हिला दहावीत ८६ टक्के तर १२ वीत ९० टक्के गुण होते. एवढी टककेवारी असताना देखील तिने अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.कंगना रणौत बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगनाला लहानपणी अभिनेत्री नव्हे तर डॉक्टर बनायचे होते. डेहराडूनमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ती पुढील शिक्षणासाठी दिल्लीत आली. कंगना १२वीत नापास झाली. यानंतर तिने आपला मोर्चा मॉडलिंगकडे वळवला आणि आज ती बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.हिमांशू सोनी हिमांशू सोनी या टीव्ही अभिनेत्याला शाळेत असताना १० वीत ६७ टक्के गुण होते, तर १२ वीत ७२ टक्के मिळवले होते. कोणत्याही करिअरमध्ये गुणांना विशेष महत्त्व असते. हेच हिमांशूने सिद्ध केले.अर्जुन कपूरअर्जुन कपूर १२ वीत नापास झाला होता. नापास झाल्यानंतर त्यांने अभ्यासाला रामराम ठोकून अ‍ॅक्टिंगवर लक्ष केंद्रीत केले. अर्जुनने आज बॉलिवूडमधील करिअर यशस्वी केले आहे.