सलमान खानचा ‘भारत’ हा आगामी चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘रेस3’ सुरू करण्यापूर्वीपासून सलमान या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सूक होता आणि आता या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय. याच चित्रपटात नवी माहिती समोर आली आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट ‘ओड टू माई फादर’चा आॅफिशिअल हिंदी रिमेक आहे. त्यामुळे कथेत फारसा बदल दिसणार नाही, हे ओघाने आलेच. या चित्रपटात जॅकी श्रॉफ सलमानच्या पित्याच्या भूमिकेत आहे. यापूर्वी सलमान व जॅकी ‘वीर’मध्ये एकत्र दिसले होते. प्रियांका चोप्रा सलमानच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सलमान खानची वेगवेगळी रूपे प्रेक्षकांना पाहायला मिळतील. म्हणजे तरूण ते वृद्ध अशा वेगवेगळ्या रूपात तो दिसेल. केवळ सलमानचं नाही तर प्रियांका चोप्रा ही सुद्धा यात पाच वेगवेगळ्या रूपात आहे.वाढत्या वयासोबत प्रोस्थेटिक्सच्या मदतीने तिचे लूक्स तयार केले जातील.प्राप्त माहितीनुसार, चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला प्रियांका व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न.गत रविवारी मुंबईच्या फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये ‘भारत’चे शूटींग सुरु झाले. या शेड्यूलच्या काही भागात सर्कसचे काही सीन्स शूट केले जात आहेत. चित्रपटाच्या कथेनुसार, सलमानला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी सर्कशीत काम करावे लागते. यात तो ‘मौत का कुआँ’मध्ये मोटरसायकलवर चित्तथरारक कसरती करताना दिसेल. त्याच्यासोबत या काळात दिशा पाटनीही दिसेल. दिशाने यात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारली असल्याचे कळतेय.
असा असेल सलमान खानचा ‘भारत’, जाणून घ्या, कोण साकारणार कुठली भूमिका!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 9:25 PM