थोडीशी विश्रांती....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2016 08:32 IST
इमरान हाश्मी,नर्गिस फाखरी आणि प्राची देसाई हे तिघांनी ‘अजहर’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी काही थोडा वेळ विश्रांती घेतली. मोहम्मद अजहरूद्दीन यांच्या ...
थोडीशी विश्रांती....
इमरान हाश्मी,नर्गिस फाखरी आणि प्राची देसाई हे तिघांनी ‘अजहर’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी काही थोडा वेळ विश्रांती घेतली. मोहम्मद अजहरूद्दीन यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक मध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत असून प्राची आणि नर्गिस या दोघी त्याच्या सहकलाकार आहेत.नुकत्याच अजहरच्या सेटवर त्या थोडा वेळ निवांतपणा म्हणून चक्क इमरानच्या खांद्यावर डोके टेकवून झोपल्या. हा फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. लवकरच चित्रपटाचा ट्रेलरही येणार आहे. ते तिघेही अभिनयावर प्रचंड भर देताना दिसत आहेत.इमरानने अजहरच्या निमित्ताने काही प्रमाणात क्रिकेटही शिकून घेतला आहे. आता नक्कीच आपण थोडाही वेळ वाट पाहू शकत नाही, आता केव्हा चित्रपटाचा ट्रेलर येतो असे झाले आहे.