सलमानच्या वादग्रस्त कमेंटनंतर लूलियाने केले असे काही!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2016 11:46 AM
सलमान खान आणि वाद यांचे जुने नाते आहे. यावेळी सलमान आपल्या असंवेदनशील प्रतिक्रियेमुळे वादात सापडला. ‘सुल्तान’च्या पत्रपरिषदेत सलमानने स्वत:ची ...
सलमान खान आणि वाद यांचे जुने नाते आहे. यावेळी सलमान आपल्या असंवेदनशील प्रतिक्रियेमुळे वादात सापडला. ‘सुल्तान’च्या पत्रपरिषदेत सलमानने स्वत:ची तुलना बलात्कारपीडित महिलेशी करून टाकली. यानंतर सलमानला तीव्र टीका सहन करावी लागली. सलमानच्या या वादग्रस्त कमेंटनंतर सलमानची कथित गर्लफ्रेन्ड लूलिया वंतूर हिनेही एक पाऊल उचलले. कुठले माहितीयं?? तिने स्वत:चे इंस्टाग्राम अकाऊंट रिस्ट्रिक्टेड मोडवर टत्तकले. कदाचित सलमानशी संबंधित गॉसिप्सपासून वाचण्यासाठी लूलियाने हे केले असावे. कदाचित वाद शांत झाल्यावर लूलिया पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर सक्रीय होईल..होप सो!