बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान(Salman Khan)ला आज सिने इंडस्ट्रीचा सुलतान म्हटले जाते. सलमान खानला प्रेक्षकांनी २६ ऑगस्ट १९८८ ला 'बीवी हो तो ऐसी' चित्रपटातून पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिले होते. या चित्रपटात सलमान खानची भूमिका खूपच छोटी होती. एका वर्षानंतर १९८९ मध्ये 'मैंने प्यार किया' या चित्रपटातून त्याने अभिनेत्याच्या भूमिकेत पदार्पण केले. अशा परिस्थितीत आता ३४ वर्षांनंतर सलमान खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप सुपरस्टार्सपैकी एक आहे. त्याच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात त्याने भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक हिट आणि सर्वात आयकॉनिक ब्लॉकबस्टर दिले आहेत.
सलमान खानच्या चाहत्यांनी #34YearsOfSalmanKhanEra या ट्रेंडसह हा खास प्रसंग साजरा केला आहे. सुपरस्टारने त्याच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्रेम आणि समर्थनासाठी सलमानने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर त्याच्या पुढील चित्रपटाचे नाव जाहीर केले.
सलमानने व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, ३४ वर्षांपूर्वी होता आणि आता ३४ वर्षांनंतर तो आता आहे. माझ्या आयुष्याचा प्रवास एका अज्ञात ठिकाणाहून सुरू झाला आणि आता दोन शब्दांचा बनला आहे, आज आणि इथे. माझ्यासोबत या प्रवासात राहिलात त्याबद्दल धन्यवाद. आता माझ्यासोबत आहे आणि माझ्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद. याचे मला खूप कौतुक वाटते. सलमान खान.
भाईजान ३ वर्षांनंतर झळकणार रुपेरी पडद्यावरसलमान खान 'किसी का भाई...किसी की जान' या चित्रपटाद्वारे ३ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. असे ऐकले आहे की हा चित्रपट सलमान खानच्या चित्रपटाकडून अपेक्षित असलेल्या सर्व घटकांनी परिपूर्ण आहे – अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा, रोमान्स आणि उत्तम संगीत. असे मानले जाते की हा सलमान खानचा 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपट आहे, ज्याचे नाव बदलण्यात आले आहे. यापूर्वी चित्रपटाचे नाव 'भाईजान' असे होते.