अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. ऐश्वर्या व अभिषेकने २००७ साली लग्न केले होते. त्या दोघांचं लग्न २० एप्रिलला प्रतीक्षा बंगल्यात विवाह सोहळा पार पडला होता. तेव्हापासून आतापर्यंत दोघांना सिनेइंडस्ट्रीतील फेव्हरिट कपल म्हणून पाहिले जाते. लग्नानंतर ऐश्वर्याने एक मुलाखत दिली होती आणि त्या क्षणाबद्दल सांगितले की जेव्हा तिला आता ती विवाहित असल्याची जाणीव झाली होती. तिने यावर तिची व अभिषेकची काय प्रतिक्रिया होती हेदेखील सांगितले.
ऐश्वर्याने सांगितले होते की, आम्ही बोरा बोराच्या आमच्या हनीमून फ्लाइटमध्ये होतो. स्टीवर्डने ऑन बोर्डमध्ये स्वागत करताना म्हटलं वेलकम मिसेस बच्चन. त्यानंतर मी आणि अभिषेकने एकमेकांकडे पाहिले आणि जोराजोरात हसू लागलो. तेव्हा मला जाणीव झाली की मी विवाहित आहे. मी मिसेस बच्चन आहे.
२००० साली पहिल्यांदा अभिषेक आणि ऐश्वर्याने ढाई अक्षर प्रेम के चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर तीन वर्षानंतर म्हणजेच २००३ साली त्या दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट होता कुछ ना कहो. त्यावेळी ते दोघे फक्त फ्रेंड होते.
२००५ साली पुन्हा एकदा त्यांनी बंटी और बबली सिनेमात काम केले. या चित्रपटातील कजरारे या गाण्यात फक्त ऐश्वर्याने काम केले होते. पण या गाण्याच्या शूटिंगदरम्यान ते दोघे एकमेकांना लाइक करू लागले.
त्यानंतर दोघांनी उमराव जान, गुरू आणि धूम २मध्ये एकत्र काम केले. चित्रपटादरम्यान त्या दोघांना बराच वेळ मिळाला आणि त्या दोघांमध्ये प्रेम झाले. आतापर्यंत दोघांनी ८ सिनेमात एकत्र काम केले आहे. आता पुन्हा एकदा दोघे एका सिनेमात एकत्र दिसणार आहे. या सिनेमाचे नाव आहे 'गुलाब जामुन' आणि या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग कश्यप करणार आहे.