something Spicy: होय, प्रियांकाने केले ‘एक्स’ ला किस!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2017 03:22 PM2017-01-15T15:22:04+5:302017-01-15T15:22:04+5:30

‘कॉफी विद करण’चे पाचवे सीझन सध्या बरेच चर्चेत आहे. ‘कॉफी विद करण’च्या प्रत्येक एपिसोडमध्ये एकापाठोपाठ एक मोठे खुलासे होत ...

something Spicy: Yes, Priya Kya kiya 'X' ki !! | something Spicy: होय, प्रियांकाने केले ‘एक्स’ ला किस!!

something Spicy: होय, प्रियांकाने केले ‘एक्स’ ला किस!!

googlenewsNext
ॉफी विद करण’चे पाचवे सीझन सध्या बरेच चर्चेत आहे. ‘कॉफी विद करण’च्या प्रत्येक एपिसोडमध्ये एकापाठोपाठ एक मोठे खुलासे होत आहेत. तेवढीच करणच्या या चॅट शोची लोकप्रीयता वाढते आहे. या चॅट शोमध्ये लवकरच प्रियांका चोप्रा गेस्ट म्हणून दिसणार आहे. सध्या हॉलिवूडमध्ये बिझी असलेली प्रियांका अलीकडे भारतात आली होती. यावेळी तिने करणच्या या शोचा एपिसोड शूट केला होता. तिच्यासोबत या शोमध्ये कोण आले होते? तर कुणीही नाही. म्हणजेच प्रियांका या शोमध्ये सोलो गेस्ट होती.

तिचा हा एपिसोड लवकरच टेलिकास्ट होणार आहे. तत्पूर्वी प्रियांकाने या चॅट शोदरम्यान केलेल्या काही खास खुलाशांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या चॅट शोदरम्यान प्रियांका ‘टकीला शॉट’ नामक गेम खेळताना दिसली. यापूर्वी एलेन डीजेनरेसच्या लोकप्रीय चॅट शोमध्ये सुद्धा प्रियांका हा गेम खेळताना दिसली होती. अर्थात डीजेनरेसच्या चॅट शोमध्ये प्रियांकाला खरोखरीच ‘टकीला शॉट’ मारावा लागला होता. आता करणचा शो इंडियन टेलिव्हिजन शो असल्यामुळे या गेममध्ये ‘टकीला’  ऐवजी ‘कॉफी शॉट’ लागला. या गेमचा एकच नियम. तो म्हणजे, होस्टने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे असेल तर तुम्हाला ‘टकीला शॉट’ प्यावा लागेल. यावेळी करणने प्रियांकाला काही ‘व्हेरी पर्सनल’ प्रश्न विचारले आणि प्रियांका नेमकी कचाट्यात सापडली. तू कधी तुझ्या पार्टनरसोबत शॉवर घेतला आहेस का? ब्रेकअपनंतर तुझ्या एक्स बॉयफ्रेन्डला किस केले आहेस का? असे दोन ‘स्पाईसी’ प्रश्न करणने विचारले आणि या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरादाखल प्रियांकाने ‘टकीला शॉट’ मारला. व्हेरी स्पायसी ना!!

Web Title: something Spicy: Yes, Priya Kya kiya 'X' ki !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.