Join us

रिया चक्रवर्तीच्या टीशर्टवर लिहिलं होतं असं काही, ज्याची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 4:27 PM

रियाला एनसीबीने अटक केली असून तिची आज वैद्यकीय तपासणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा आता सीबीआय, ईडी आणि नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरो तपास करत आहे. या प्रकरणात आता ड्रग्स अँगेल समोर आला आहे. याप्रकरणी आता एनसीबीने कारवाई करायला सुरूवात केली आहे. दरम्यान रियाला एनसीबीने अटक केली असून तिची आज वैद्यकीय तपासणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी रियाला बऱ्याचदा चौकशीसाठी नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरोच्या ऑफिसमध्ये जावे लागत होते. यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आज तिने परिधान केलेल्या टीशर्टकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या टीशर्टवरील मेसेजची चर्चा होत आहे.

रिया आज नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरोच्या ऑफिसमध्ये ज्या आउटफिटमध्ये पोहचली आहे. तिच्यावर सगळ्यांचे नजरा होत्या. यावेळी रियाने डेनिम जीन्स, ब्लॅक शर्ग आणि ब्लॅक टी शर्ट परिधान केले होते. तिच्या टीशर्टवरील मेसेजची सगळीकडे चर्चा होते आहे.

जर रियाचे टीशर्ट नीट पाहिले तर लक्षात येईल त्यावर काहीतरी लिहिले आहे. टीशर्टवर इंग्रजीत लिहिले आहे की, Roses Are Red, Violets Are Blue, let’s Smash Patriarchy Me And You. ही एक म्हण आहे. या ओळींचा अर्थ आहे की पित्तृसत्ता म्हणजेच पुरूष प्रधान संस्कृती नष्ट करायची आहे. जुनी व्यवस्था संपवायची आहे.रियाला झाली अटकएनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाला आज अटक केलीआहे. तिच्या अटकेनंतर रियाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात येईल. सायंकाळी पाचच्या सुमारास वैद्यकीय तपासणी होईल. एनसीबी कार्यालयात सध्या रियाची तिसर्‍या दिवशी चौकशी केली जात आहे. रियाचा भाऊ शोविक आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत आहे. एनसीबीने एनडीपीएस ऍक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे. याआधी एनसीबीने रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे.

म्हणे, सुशांतने मला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली; रिया चक्रवर्तीचा यु-टर्न

सुशांतच्या बहिणीविरोधात रियाने केली तक्रारसुशांत सिंग राजपूतच्या बहिणीविरोधात रिया चक्रवर्तीने वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या बहिणींवर रियाने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, बेकायदेशी कृत्य करणे, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा यांसह कलम अशा एकूण 13 कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. सुशांतची बहिण प्रियांका, मितू आणि डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. रियाने या तिघांवर दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाने आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्तीगुन्हा अन्वेषण विभाग