बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा बऱ्याचदा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतो. यात खासकरुन त्याची लव्हलाइफ सर्वाधिक वेळा चर्चिली गेली. आजवर सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. यात ऐश्वर्या रायसोबत असलेल्या नात्याची तर आजही चर्चा होते. मात्र, सलमानने शारीरिक,मानसिक छळ केल्याचा आरोप करत ती सलमानपासून विभक्त झाली. तिच्यानंतर सलमानच्या आणखी एका एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे.
अभिनेत्री सोमी अली साऱ्यांनाच ठावूक असेल. एकेकाळी सलमानला डेट करणाऱ्या सोमीने मध्यंतरी त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. इतकंच नाही तर सलमानवर टीका करण्याची एकही संधी ती सोडत नाही. सोमीची डिस्कव्हरी प्लसवर 'फाईट ऑर फ्लाइट' ही नवीन सीरिज येत आहे. परंतु, ही सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच ती बंद व्हावी यासाठी सलमान चॅनेलवर प्रेशर देत असल्याचा आरोप सोमीने केला. इतकंच नाही तर मी त्याने केलेल्या अत्याचारांना वाच्या फोडेन असंही त्याला वाटलं असेल म्हणून तो असं करत असेल, असं म्हणत तिने सलमानवर आरोप केले होते. विशेष म्हणजे एका मुलाखतीत तिने सलमानवर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे आरोप केले आहे.
"त्याने माझं बरंच शोषण केलं. सतत मला शिव्या देऊन मारहाण करायचा. आम्ही कुठेही बाहेर गेलो की मला कसं बेज्जत करता येईल यासाठी तो प्रयत्न करायचा. सलमानच्या याच जाचाला कंटाळून मी दुसऱ्या एका व्यक्तीच्या रिलेशनमध्ये आले जे सलमानला सहन झालं नाही. माझं दुसऱ्यासोबत अफेअर असल्याचं समजल्यानंतर त्याने मला बेदम मारहाण केली", असं सोमी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्याने मला जळत्या सिगारेटचे चटके दिले. मला मारत असताना त्याला आनंद होत होता आणि तो मला मारताना हसत होता. तो मारत असताना मी ओरडले तर तो अजून मारायचा. तो काळ माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ होता. ते दिवस मी कधीच विसरु शकणार नाही. शेवटी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मी फ्लोरिडाला शिफ्ट झाले. पण,आजही ते दिवस विसरणं शक्य नाही. तो स्वतः एनजीओ चालवतो पण असा माणूस जो स्वतः माणूस म्हणायच्या लायकीचा नाही तो फक्त नावासाठी हे सगळं करतोय. चेहऱ्यावरून तो साधा वाटतो नावासाठी चॅरिटी ट्रस्ट चालवतो पण खऱ्या आयुष्यात तो खूप निर्दयी आहे."
दरम्यान, सोमी अली आणि सलमान १९९१ ते १९९८ या काळात एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्यांचा पुढे ब्रेकअप झाला. यानंतर सोमी फ्लोरिडाला शिफ्ट झाली आणि तेथे तिने ‘नो मोअर टीअर्स’ ची स्थापना केली. घरगुती हिंसाचार आणि लैंगिक शोषण आणि आयुष्यात इतरांकडून दुखावलेल्या पीडितांना सहायता कार्यच काम ती अनेक वर्ष करत आहे.