'सोन चिरैया' चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चंबळची कथा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यातील कलाकारांचा दमदार अभिनय व संवाद पाहून या चित्रपटाची उत्सुकता आणखीन वाढली आहे.
'सोन चिरैया' चित्रपटात मध्य भारतातील डाकूवर आाधारीत असून यातील सर्व कलाकार हिंदी भाषेव्यतिरिक्त बुंदेलखडी भाषा बोलताना दिसणार आहे. या कलाकारांना बुंदेलखडी भाषा शिकवण्यासाठी राम नरेश दिवाकर या प्रशिक्षकाला बोलवण्यात आले होते. हा चित्रपट वास्तविक वाटण्यासाठी सुशांत सिंग राजपूत, मनोज वाजपेयी या कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे.सोन चिरैया चित्रपटात १९७० दशकातील कथा पहायला मिळणार आहे. ज्यात एका छोट्या शहरातील डाकूंचे वर्चस्व पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत, भूमी पेडणेकर, मनोज वाजपेयी, रणवीर शोरे व आशुतोष राणा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अभिषेक चौबे दिग्दर्शित सोन चिरैयामध्ये दमदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे. त्याकाळात चंबळच्या खो-यात दरोडेखोरांचे साम्राज्य होते. खरे तर याआधीही दरोडेखोरांवरचे अनेक सिनेमे आपण पाहिलेत. पण त्यासगळ्या चित्रपटाच्या केंद्रस्थानी केवळ दरोडा, हिंसाचार, लूटमार हेच आपल्याला बघायला मिळाले. ‘सोन चिरैया’मध्ये मात्र एक वेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचा दावा मेकर्सकडून केला जात आहे.