अभिनेता सुशांत सिंग राजपूत आगामी चित्रपट ‘सोन चिरैया’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. चंबळच्या खो-यातील दरोडेखोरांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा चित्रपट इश्किया , डेड इश्किया आणि उडता पंजाब असे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक अभिषेक चौबे दिग्दर्शित करताहेत. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत आहे.२ मिनट ४३ सेकंदांचा हा ‘सोन चिरैया’ ट्रेलर तुमच्या अंगावर शहारे आणल्याशिवाय राहणार नाहीत. ट्रेलरमधील डायलॉग्सही एकदम दमदार आहेत. ‘बैरी बेईमान, बागी सावधान,’ अशी येत्या ८ फेबु्रवारीला पे्रक्षकांच्या भेटीस येणा-या या चित्रपटाची टॅगलाईन आहे. तेव्हा ‘सोन चिरैया’चा ट्रेलर एकदा पाहाच आणि कसा वाटला ते जरूर कळवा...
सुशांत सिंग राजपूतसह भूमी पेडणेकर,मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सगळ्यांची झलक ट्रेलरमध्ये दिसतेय. पण सुशांत व भूमीला या रूपात पाहणे इंटरेस्टिंग आहे. दोघेही पहिल्यांदा अशा आगळ्या-वेगळ्या रूपात दिसत आहेत. अलीकडे एका मुलाखतीत, या चित्रपटातील भूमिका मी केवळ एक आव्हान म्हणून स्वीकारल्याचे सुशांतने सांगितले होते. हे आव्हान पेलण्यात सुशांत किती यशस्वी झाला हे तर चित्रपट रिलीज झाल्यानंतरचं कळेल. तूर्तास चित्रपटाचा टेलर पाहून सुशांत या भूमिकेत अगदी फिट बसल्याचे दिसतेय. ‘सोन चिरैया’मध्ये १९७० च्या दशकातील कथा पाहायला मिळणार आहे. त्याकाळात चंबळच्या खो-यात दरोडेखोरांचे साम्राज्य होते. खरे तर याआधीही दरोडेखोरांवरचे अनेक सिनेमे आपण पाहिलेत. पण त्यासगळ्या चित्रपटाच्या केंद्रस्थानी केवळ दरोडा, हिंसाचार, लूटमार हेच आपल्याला बघायला मिळाले. ‘सोन चिरैया’मध्ये मात्र एक वेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचा दावा मेकर्सकडून केला जात आहे.