सोनम कपूरविषयी बहीण रिया कपूरने केला मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2017 12:28 PM
आपल्या फॅशन सेंससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर हिने बहीण रिया कपूरसोबत आपल्या पहिल्या ‘रिसन’ या फॅशन ब्रॅण्डचे लॉन्चिंग ...
आपल्या फॅशन सेंससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर हिने बहीण रिया कपूरसोबत आपल्या पहिल्या ‘रिसन’ या फॅशन ब्रॅण्डचे लॉन्चिंग केले. यावेळी सोनमविषयी बोलताना खुलासा केला की, या ब्रॅण्डच्या लॉन्चिंगची योजना सोनमची होती. जेव्हा लॉन्च कार्यक्रमात रियाला विचारण्यात आले की, हा ब्रॅण्ड लॉन्च करण्यामागे कोणाची कल्पना होती? त्यावर रियाने उत्तर देताना सोनमचे नाव समोर केले. रियाने दिलेल्या माहितीनुसार, सोनमला अनेक ब्रॅण्डकडून त्यांच्या प्रमोशनसाठी विचारणा केली जाते. ते सोनमसोबत डिझाइन आणि फॅशन लाइन सुरू करू इच्छित होते. तेव्हा सोनमने माझ्याकडे येऊन म्हटले की, ‘चल स्वत:चेच ब्रॅण्ड लॉन्च करुयात.’ यावेळी रियाने हेही स्पष्ट केले की, ती सुद्धा या ब्रॅण्डचा एक भाग आहे. तर सोनमने आपल्या ब्रॅण्डविषयी बोलताना म्हटले की, मी अशा काही गोष्टींवर काम करू इच्छित होते, ज्याचे पालकत्त्व पूर्णत: आमच्याकडेच असायला हवेत. ज्यामध्ये आम्हाला इन्व्हेस्ट करण्यात वाव असावा. ‘रिसन’ला लॉन्च करण्याचे एकमेव कारण म्हणजे मुलींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे होय. ज्याठिकाणी त्यांना स्टायलीश दिसण्यासाठी फारसे पैसे खर्च करण्याची गरज पडू नये. ‘कान्स’विषयी सोनमला विचारले असता, हे माझ्यासाठी खूपच स्पेशल असेल असे तिने सांगितले. सध्या सोनमची बहीण रिया तिच्यासाठी कपडे डिझाइन करीत आहे. सोनमने सांगितले की, मी आणि रिया नेहमीच काहीतरी हटके करण्याचा विचार करीत आलो आहोत. सोनमच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाची लवकरच शूटिंग सुरू केली जाणार आहे. यामध्ये ती अभिनेत्री करिना कपूर हिच्याबरोबर झळकणार आहे.