Join us

​सोना मोहपात्रा चर्चेत आहे! कारण काय तर, कंगना राणौतची ‘सर्कस’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2017 9:48 AM

‘गली में मारे फेरे’, ‘नैना’,‘जिया लागे रे’ अशी लोकप्रीय गाणी गाणारी गायिका सोना मोहपात्रा चर्चेत आहे. तिच्या चर्चेत येण्याचे ...

‘गली में मारे फेरे’, ‘नैना’,‘जिया लागे रे’ अशी लोकप्रीय गाणी गाणारी गायिका सोना मोहपात्रा चर्चेत आहे. तिच्या चर्चेत येण्याचे कारण आहे कंगना राणौत. होय, सध्या सगळीकडे कंगनाने ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीचीच चर्चा आहे. याच मुलाखतीवर सोनाने फेसबुक पोस्ट लिहिली आहे. आता कंगनाच्या या मुलाखतीवर सोनाने एवढी लांबलचक पोस्ट का लिहावी, हे मात्र आम्हाला कळले नाहीय. या पोस्टमध्ये सोनाने कंगनाच्या मुलाखतीला  ‘सर्कस’ म्हटले आहे. केवळ इतकेच नाही तर कंगनाची ही मुलाखत महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारी आहे, असेही ती म्हणाली.सोनाने लिहिलेय, ‘प्रिय कंगना, मी कायम खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात तुला खंबीर पाठींबा दिला आहे. तू बॉलिवूडची ‘क्वीन’ बनण्यापूर्वीपासून मी तुझी चाहती आहे. पण सध्या तुझ्या लव्ह लाईफ आणि पर्सनल डिटेल्सबद्दल जे काही सुरु आहे, ते प्रोफेशनल पीआरपलीकडे दुसरे तिसरे काहीही नाही. . ‘सिमरन’हा तुझा सिनेमा प्रदर्शित होतोय. त्यापूर्वी हे सगळे करणे माझ्यामते, योग्य नाही. आधी तू ज्याप्रमाणे निडर होत मुलाखती दिल्या, स्वत:चे मुद्दे ठामपणे मांडलेत, मोठ्या मुद्यांवर ठोस भूमिका घेतली, त्याचे मी स्वागत करते. पण सध्या जे काही तू चालवले आहेत, त्याला मी केवळ, सर्कस म्हणेल.’पुढे सोनाने लिहिलेय की, ‘हे एका कामकाजी महिलेने दुसºया कामकाजी महिलेस दिलेला मत आहे. यामागे फुकटची लोकप्रीयता लाटण्याचा माझा कुठलाही उद्देश नाही. मी समजू शकते की, अनेक संकटे पार करून तू यशाचे मुक्काम गाठलेयं. पण याठिकाणी तू स्वत:त सकारात्मक बदल आणणार असशील तर ते अधिक योग्य ठरेल’.ALSO READ : ​विवाहित-अविवाहित, तरूण-म्हातारे सगळ्यांनीच चान्स मारू बघितला ! कंगना राणौत पुन्हा बोलली!!सोना मोहपात्राचा हा सल्ला आता कंगना किती मनावर घेते, ते येत्या काळात दिसेलच. शिवाय सोनाला या फेसबुक पोस्टमुळे किती लोकप्रीयता मिळते, तेही दिसलेच. तोपर्यंत प्रतीक्षा.