अली अब्बास जफरच्या ‘भारत’ या आगामी सिनेमात सलमान खान आणि प्रियंका चोप्राची जोडी बनणार होती. पण प्रियंकाने ऐनवेळी या चित्रपटास नकार दिला आणि यात कतरीना कैफची एन्ट्री झाली. खरे तर ‘भारत’ला नकार दिल्याचा मुद्दा प्रियंका कधीच विसरली. पण भाईजान मात्र अद्यापही हा नकार पचवू शकलेला नाही. त्यामुळेच प्रियंकाने लग्नासाठी एक सर्वोत्तम चित्रपट सोडला. अशा चित्रपटासाठी मुली आपल्या पतीला सोडतात. पण प्रियंकाने पतीसाठी चित्रपट सोडला, असे सलमान ताज्या मुलाखतीत म्हणाला. सलमानचे हे वाक्य प्रियंकाने किती मनावर घेतले, ते आम्हाला ठाऊक नाही. पण सिंगर सोना मोहपात्रा हिला मात्र सलमानचे हे बोल जराही रूचले नाही. मग काय, सोना पुन्हा एकदा भाईजानवर उखडली.
‘भारत’च्या एपिसोडवर सोना मोहपात्रा भडकली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 16:07 IST
अली अब्बास जफरच्या ‘भारत’ या आगामी सिनेमात सलमान खान आणि प्रियंका चोप्राची जोडी बनणार होती. पण प्रियंकाने ऐनवेळी या चित्रपटास नकार दिला आणि यात कतरीना कैफची एन्ट्री झाली. खरे तर ‘भारत’ला नकार दिल्याचा मुद्दा प्रियंका कधीच विसरली. पण भाईजान मात्र अद्यापही हा नकार पचवू शकलेला नाही.
‘भारत’च्या एपिसोडवर सोना मोहपात्रा भडकली!!
ठळक मुद्दे‘भारत’ या चित्रपटातून प्रियंकाने ऐनवेळी अंग काढून घेतले होते. शूटींग पाच दिवसांवर आले असताना प्रियंकाने या चित्रपटासाठी नकार दिला होता.