सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 2 जून 1987 रोजी पाटणा, बिहार येथे झाला. सोनाक्षी सिन्हा ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची मुलगी आहे. सोनाक्षीने तिचे शालेय शिक्षण आर्य विद्या मंदिर येथून केले आणि त्यानंतर तिने श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे महिला विद्यापीठाच्या प्रेमलिला विठ्ठलदास पॉलिटेक्निकमधून फॅशन डिझायनिंग केले. सोनाक्षी एक अभिनेत्री असण्यासोबतच फॅशन डिझायनर देखील आहे.
सोनाक्षीने तिच्या करिअरची सुरुवात कस्टमर डिझायनर म्हणून केली होती. तिने चित्रपटांमध्ये कॉस्च्युम डिझायनिंग केले. मेरा दिल लेके देखो (2005) या चित्रपटासाठी तिने कॉस्च्युम डिझाइन केले होते. सिनेइंडस्ट्रीत येण्यापूर्वी तिचे वजन चक्क ९० किलो इतके होते. हे ऐकून जरा तुम्हाला धक्का बसला असेल ना... हो, हे खरे आहे. तिने चक्क ९० किलो वजन होते आणि तिने दबंग चित्रपटासाठी तब्बल ३० किलोंनी वजन घटवले.
त्यानंतर सोनाक्षीने 2010 मध्ये दबंग या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता आणि सोनाक्षीनेही मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला त्या काळात त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता.
त्यानंतर सोनाक्षीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी 2012 मध्ये आलेल्या राऊडी राठौर या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत दिसली. त्यानंतर सन ऑफ सरदार, दबंग 2, लुटेरा, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, बुलेट राजा, हॉलिडे अशा अनेक चित्रपटात काम केले.
सोनाक्षीच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती अभिनेत्री अर्जुन कपूरला तेवर चित्रपटादरम्यान डेट करत होती. मात्र, वर्षभरानंतरच त्यांचे नाते तुटले. या अभिनेत्रीचे नावही शाहिद कपूरसोबत जोडले गेले होते. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच काही सांगितले नव्हते. दुसरीकडे, सोनाक्षी सध्या झहीर इक्बालला डेट करत आहे, जो तिच्यासोबत डबल एक्सएल चित्रपटात दिसला होता. झहीरने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या नात्याबद्दल सांगितले होते.