Join us

सोनाक्षी सिन्हा ह्या सिनेमात चालवताना दिसणार ट्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 18:29 IST

सोनाक्षी सिन्हाने एका सीनसाठी जवळपास २५ ते ३० किलोमीटर अंतरापर्यंत ट्रक चालवला.

ठळक मुद्देसोनाक्षीने ट्रक चालवून सेटवर सर्वांना केले थक्कसोनाक्षी सिन्हा बनली हॅपी

बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हॅप्पी फिर भाग जायेगी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हॅप्पी फिर भाग जायेगी हा सिनेमा हॅप्पी भाग जायेगीचा सीक्वल आहे. या चित्रपटाची निर्मिती इरॉस इण्टरनॅशनल व आनंद एल. राय यांच्या कलर यलो प्रोडक्शनने केली आहे आणि दिग्दर्शन मुद्दसर अजीज यांनी केले आहे. या चित्रपटात सोनाक्षीचा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ती ट्रकदेखील चालवताना दिसणार आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमातील एका सीनसाठी सोनाक्षी सिन्हाला ट्रक चालवताना दाखवाचे होते. हा सोपा टास्क नव्हता. दिग्दर्शक मुद्दसर सोनाक्षी ट्रक चालवेल की नाही याबाबत संभ्रमात होता. पण, तिने मुद्दसरला थक्क केले. तिने जवळपास २५ ते ३० किलोमीटर अंतरापर्यंत ट्रक चालवला.सोनाक्षीने सांगितले की, ट्रक चालवणे सोपे नव्हते. त्यामुळे सेटवरील सर्वच जण मी ट्रक चालवेन, याबाबत संभ्रमात होते. नशीबाने मी सोळा वर्षांची असताना मॅन्युअल एसयुव्ही चालवली होती. पण, ट्रकचे स्टीअरिंग खूप जड व कठीण होते. मात्र मला ट्रक चालवायला जमले. सेटवरील सर्वजण ट्रक चालवताना पाहून आश्चर्यचकीत झाले होते.

दोन वर्षांपूर्वी आलेला 'हॅपी भाग जायेगी' या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अनपेक्षित यश मिळवले होते. चित्रपटाचे हेच यश पाहून मेकर्सनी या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची घोषणा केली होती. 'हॅपी फिर भाग जायेगी' नामक हा सीक्वल प्रदर्शनासाठी तयार आहे. या सिनेमात डायना पेंटी, जिमी शेरगिल, अली फजल, पियुष मिश्रा, जस्सी गिल व अपारशक्ती खुराना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात डायना पेेंटी लीड रोलमध्ये होती. सीक्वलमध्ये सोनाक्षी सिन्हा हॅपी बनलेली दिसते. हा चित्रपट २४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाडायना पेन्टी