Join us

सोनाक्षी सिन्हाचा रुमर्ड बॉयफ्रेंड कोण आहे? वाढदिवशी 'दबंग गर्ल'ची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 19:40 IST

जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांचं अफेअर आता काही लपून राहिलेलं नाही.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. सध्या ती कोणत्याही सिनेमात दिसत नसली. तरी चर्चेत मात्र कायम असते. नुकतेच रुमर्ड बॉयफ्रेंड जहीर इक्बालसाठी सोनाक्षीने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

 सोनाक्षी सध्या प्रेमात आकंठ बुडाली आहे. जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांचं अफेअर आता काही लपून राहिलेलं नाही. दोघे गेल्या काही काळापासून एकमेंकाना डेट करत आहेत. आज सोनाक्षीने जहीर इक्बालला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्यासोबतच्या सुंदर आठवणींचा कोलाज व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ 'हॅपी बर्थडे'च्या ट्यूनवर सेट करण्यात आला आहे.

सोनाक्षीने कॅप्शनमध्ये लिहले, 'द क्रे टू माई जेड(ई)...हे अगदी स्पष्ट आहे. माझ्या स्वतःच्या सायको जहीर इक्बालला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा'.  जहीर सोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांमुळे सोनाक्षी खूप चर्चेत आहे. मात्र, दोघांनी आपण फक्त चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाक्षी यो यो हनी सिंगसोबत 'कलास्टार' या गाण्यात दिसली होती. येत्या काही दिवसांत ती अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात पहायला आहे. जहीरबद्दल बोलायचे सलमानने त्याला ‘नोटबूक’ चित्रपटातून लॉन्च केलं होतं. तर जहीरची बहीण सनम रतनसी बॉलिवूडमधीलसेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे. सोनाक्षीसोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी दाक्षिणात्य अभिनेत्री दीक्षा सेठ आणि बॉलिवूड अभिनेत्री सना सईदसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. शिवाय,  जहीरच्या कुटुंबाचा दागिन्यांचा व्यापार आहे. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाबॉलिवूडसेलिब्रिटी