Sonakshi Sinha Engagement : बॉलिवूडची सोना अर्थात सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha ) सध्या चित्रपटांमुळे नाही तर पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, गेल्या अनेक दिवसांपासून सोनाच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. सध्या चर्चा आहे ती सोनाक्षीच्या साखरपुड्याची. होय, सोनाक्षीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ते पाहून तिनं गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा सुरु झाली आहे.
सोनाक्षीनं शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोवरुन तिचा साखरपुडा झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेकांनी सोनाला शुभेच्छा दिल्या आहेत. अगदी अभिनेता फरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरनंही सोनाला शुभेच्छा दिल्या आहेत. अद्याप सोनाक्षीच्या खरपुड्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवाय खरंच साखरपुडा झाला तर तिचा प्रिन्स चार्मिंग नेमका कोण आहे, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे.
तो प्रिन्स चार्मिंग जहीर इक्बाल?गेल्या अनेक दिवसांपासून सोना अभिनेता जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. अर्थात सोना वा जहीरनं याबद्दल मौन बाळगलं आहे. जहीरनं ‘नोटबुक’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. सोनाचा प्रिन्स चार्मिंग जहीर असल्याचा अंदाज तूर्तास बांधला जातोय. खरं काय ते लवकर कळेलच.
2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दबंग चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील सोनाक्षी आणि सलमान खान यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दोघांच्या अफेअरबाबत त्यावेळी चर्चा सुरू होत्या.