ठळक मुद्देसोनाक्षीने अॅमेझॉन या लोकप्रिय ई कॉमर्स साईटवरुन एका महागड्या ब्रँडचे हेडफोन्स मागवले होते. सोनाक्षीला पार्सलही आले. पण पार्सल उघडल्यानंतर त्यातली वस्तू बघून सोनाक्षीला धक्काचं बसला.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आॅनलाईन फ्रॉडची शिकार ठरली आहे. होय, सोनाक्षीने मागवले हेडफोन्स अन् तिला पार्सलने आला तो लोखंडी नळाचा तुकडा. होय, ऐकता ते खरे आहे. ई- कॉमर्स साईवरुन खरेदी करताना फसवणुकीचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. महागड्या वस्तूंच्या बदल्यात पार्सलमध्ये साबणाची वडी, दगड अशा वस्तू येण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. सोनाक्षीसोबतही हाच प्रकार घडला.
सोनाक्षीने अॅमेझॉन या लोकप्रिय ई कॉमर्स साईटवरुन एका महागड्या ब्रँडचे हेडफोन्स मागवले होते. सोनाक्षीला पार्सलही आले. पण पार्सल उघडल्यानंतर त्यातली वस्तू बघून सोनाक्षीला धक्काचं बसला. होय, बॉक्स उघडून पाहिला तेव्हा त्यात हेडफोन्सच्या बदल्यात लोखंडी नळाचा तुकडा तिला दिसला. सोनाक्षीने लगेच याबाबत ट्विट करत नाराजी व्यक्त केली. शिवाय यासंदर्भात अॅमेझॉनकडे तक्रारही केली. पण तक्रारीदरम्यानही तिला नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले. अॅमेझॉनच्या ग्राहक सेवेने तक्रार करूनही कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. यावरही सोनाक्षीने ट्विट करून नाराजी व्यक्त केली. हेडफोन्सचा बॉक्स अगदी व्यवस्थितरित्या पॅक करून आला होता, मात्र त्यात हेडफोन्सएवजी पाइपचा तुकडा होता, असे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सोनाक्षीबद्दल सांगायचे तर तूर्तास ती अभिनेता जहीर इक्बालला डेट करत असल्याचे मानले जात आहे. अलीकडे जहीरने आपल्या वाढदिवसाची पार्टी दिली. या पार्टीतील प्रत्यक्षदर्शीचे मानाल तर सोना व जहीर यांची पार्टीतील केमिस्ट्री बरेच काही सांगणारी होती. दोघांनीही पार्टीत बराच वेळ एकत्र घालवला. यावेळी त्यांची जवळीक सगळ्यांनीच बघितली. डान्स फ्लोरवर तर दोघांनी आग लावली. आपल्या आजुबाजुला कोण आहे, हे विसरून दोघांनीही या पार्टीत म्हणे धम्माल मस्ती केली. जहीर इक्बाल हा सलमानच्या मित्राचा मुलगा आहे. सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटातून जहीर बॉलिवूड डेब्यू करतोय. मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन ही सुद्धा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. पण तूर्तास जहीरच्या डेब्यू चित्रपटापेक्षा सोनाक्षीसोबत त्याच्या वाढलेल्या मैत्रीची चर्चा सुरु आहे.