बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी रविवारी(२३ जून) लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि जहीरने रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरचं वेडिंग रिसेप्शन मुंबईत पार पडलं. त्यांच्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. सोनाक्षीला नववधुच्या रुपात पाहून काजोल भावूक झाल्याचं दिसून आलं.
सोनाक्षी आणि जहीर यांच्या रिसेप्शनला काजोलने हजेरी लावली. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये काजोल आणि सोनाक्षी यांचं बॉण्डिंग दिसून येत आहे. सोनाक्षीने रिसेप्शन पार्टीला सुंदर अशी लाल रंगाची साडी, त्यावर साजेसे पारंपरिक दागिने केसात गजरा, हातावर मेहंदी असा लूक केला होता. अशा नववधूच्या रुपात पाहताच सोनाक्षी सिन्हाला पाहताच काजोलला गहिवरून आलं. यासोबत सोनाक्षीदेखील भावूक झाल्याचं दिसून आलं. काजोल आणि सोनाक्षीने या पार्टीत एकमेकींना घट्ट मिठी मारली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सोनाक्षी सिन्हाने २३ जून रोजी जहीर इक्बालसोबत सिव्हिल मॅरेज केले होते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रजिस्टर मॅरेज लग्नाचे फोटो शेअर केले होते. सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांनी लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. सोनाक्षीप्रमाणेच जहीरदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयाबरोबरच तो मॉडेलिंगदेखील करतो. सोनाक्षी आणि जहीरने डबल XL सिनेमात एकत्र काम केलं होतं. जहीरचे वडील व्यावसायिक असून त्याचे सलमान खानशीही मैत्रीपूर्ण संबंध आहेत.