सोनाक्षी सिन्हाच्या ‘हॅपी फिर भाग जाएगी’ या चित्रपटाकडून सोनाचं नाही तर मेकर्सलाही भरपूर अपेक्षा होत्या. ‘हॅपी भाग जाएगी’ सुपरडुपर हिट होता. याचा सीक्वल ‘हॅपी फिर भाग जाएगी’कडून म्हणूनचं अपेक्षा होत्या. पण दुदैवाने हा सीक्वल फार कमाल दाखवू शकला नाही. रिलीजपासून आजपर्यंत सोनाच्या या चित्रपटाने केवळ १५.५४ कोटींचा बिझनेस केला. कुठल्याही सीक्वलसाठी हा बिझनेस फार समाधानकारक म्हणता येणार नाही. कारण कुठलाही सीक्वल त्याच्या आधीच्या चित्रपटापेक्षा अधिक कमवेल, याच आशेने निर्मार्ते सीक्वल बनवतात. पण ‘हॅपी फिर भाग जाएगी’ या कसोटीवर अपयशी ठरला.
ट्रेड एक्स्पर्ट तरूण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हॅपी फिर भाग जाएगी’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी २.७० कोटी, शनिवारी ४.०३ कोटी, रविवारी ५.०५ कोटी, सोमवारी २.०५ कोटी आणि मंगळवारी १.७१ कोटींची कमाई केली. एकंदर काय तर अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटांसमोर सोनाच्या चित्रपटाचा टिकाव लागू शकला नाही. ‘हॅपी फिर भाग जाएगी’ हळूहळू कमाई करतोय. पण याचआठवड्यात ‘स्त्री’ आणि ‘यमला पगला दीवाना फिर से’ रिलीज झाल्यानंतर ‘हॅपी फिर भाग जाएगी’ समोरचे आव्हान आणखी वाढणार आहे. ‘हॅपी फिर भाग जाएगी’चा बजेट २५ कोटी आहे. हा बजेट तरी चित्रपट वसूल करू शकतो का, हे पाहणे इंटरेस्टिंग असेल.