Join us  

ज्या घरात लग्न केलं तेच घर सोनाक्षीनं विकायला काढलं, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 2:23 PM

सोनाक्षी सिन्हाच्या या आलिशान घराची किंमत किती आहे? याबाबात जाणून घेऊयात.

Sonakshi Sinha's wedding home listed for sale : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच चित्रपटांमुळे चर्चेत असते. सध्या सोनाक्षी ही तिच्या मुंबईतील (Mumbai) नव्या घरामुळे चर्चेत आहे. सोनाक्षीनं मुंबईमध्ये  एक आलिशान सी फेसिंग घर खरेदी केले होतं. याच घरात सोनाक्षीनं बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal ) नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. पण, आता सोनाक्षीनं हे घर थेट विकायला काढलं आहे.  सोनाक्षी सिन्हाच्या या आलिशान घराची किंमत किती आहे? याबाबात जाणून घेऊयात.

रियल इस्टेटशी संबंधित एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सोनाक्षीच्या या घरासंबंधी माहिती देण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये हे घर सोनाक्षीचे असल्याचा खुलासा करण्यात आला नाही. मात्र एका नेटकऱ्याने हे घर सोनाक्षीचे असल्याचे ओळखलं. शिवाय ही पोस्ट खुद्द सोनाक्षीने लाईक केली आहे. या पोस्टमध्ये घराचे तपशील शेअर करण्यात आले आहेत. हे 4 BHK अपार्टमेंट सी फेसिंग असून 42000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. येथे 3 कारसाठी पार्किंगची जागा देखील आहे. अपार्टमेंटची किंमत 25 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. 

सोनाक्षीच्या घराच्या बाल्कनीतून मुंबईचे वांद्रे-वरळीचे सी-लिंक स्पष्टपणे दिसतो. सोनाक्षीने घर विकायला काढल्याने तिचे चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. तिने अचानक तिचे हे घर का विकायला काढले असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. कारण, सोनाक्षीने  गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वांद्रे बेस्टमधील एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते. सोनाक्षी सिन्हाने याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. मोठ्या हौसने सोनाक्षीने हे घर सजवले होते. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हामुंबईसुंदर गृहनियोजनविक्रीपैसा