बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा सध्या ‘कलंक’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान सोनाक्षीच्या अफेअरच्या चर्चाही जोरात आहे. अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘नोटबुक’ या चित्रपटाचा लीड हिरो जहीर इक्बाल व सोना या दोघांत काहीतरी खिचडी शिजतेय, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. आत्तापर्यंत सोनाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण अखेर तिने चुप्पी तोडलीच.जहीर इक्बालसोबत तुझे नाव जोडले जातेय. यात किती सत्यता आहे? असा थेट प्रश्न सोनाला विचारण्यात आला आणि ‘कब? कैसे?’, असे दोन शब्द सोनाक्षीच्या तोंडून बाहेर पडले.
जहीर इक्बालसोबतच्या रिलेशनशिपवर सोनाक्षी सिन्हा म्हणते, कब, कैसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 1:25 PM
‘नोटबुक’ या चित्रपटाचा लीड हिरो जहीर इक्बाल व सोना या दोघांत काहीतरी खिचडी शिजतेय, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. आत्तापर्यंत सोनाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण अखेर तिने चुप्पी तोडलीच.
ठळक मुद्देसोनाक्षी आधी बंटी सचदेवासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण याचवर्षी फेब्रुवारीत दोघांचेही ब्रेकअप झाले.