केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांनी कंबर कसली आहे. दिल्लीच्या वेशीवर शेतकरी दीर्घकाळापासून आंदोलन करत आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रिटींसह हॉलिवूडच्या सेलिब्रिटींनीही या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा त्यापैकीच एक़ आता सोनाक्षीने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ एक कविता शेअर केली आहे. कविता सोनाक्षीच्या आवाजात आहे आणि सोबत शेतकरी आंदोलन स्थळीची दृश्य आहेत. ये तुम्हें दंगे वाले लगते हैं?असा सवाल या माध्यमातून तिने केला आहे.आत्तापर्यंत 8 लाखांवर लोकांनी सोनाक्षीने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहिला आहे. सोनाक्षीच्या आवाजातील ही कविता वरद भटनागरने लिहिलेली आहे. ‘नजर मिलाके खुद से पुछो क्यों?’ या कॅप्शनसह सोनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
अशी आहे कविताक्यों हम सड़कों पर उतर आए हैं खेत खलिहान के मंदिर छोड़ क्यों बंजर शहर में चले आए हैं ये माटी, हसिया दराती वाले हाथ, क्यों हमने राजनीति में सनवाए हैं दही मक्खन और गुड़ वाले ने क्यों इरादे मशालों से सुलगाए हैं बूढ़ी आंखों और नन्हे कदमों ने क्यों ये दंगे भड़काए हैं. ये तुम्हें दंगे वाले लगते हैं?अपने ही हिस्से की रोटी खाना जायज नहीं है, क्यों? मक्के दी रोटी, सरसों दा साग के बड़े चटकारे लेते हो और अब उन्हीं के लिए यह सब करना ठीक नहीं है, क्यों. नजर मिलाकर खुद से पूछो, क्यों?
सोनाक्षीने आपल्या आवाजातील ही कविता शेअर करताच शेतकरी समर्थकांनी तिला जोरदार प्रतिसाद दिला आहे. दिल जित लिया आपने तो. अपने नाम को सच कर दिया, असली सोना. सॅल्यूट यू, अशा प्रतिक्रिया त्यांनी सोनाच्या या कवितेवर दिल्या आहेत.