Join us

लग्नाच्या 6 महिन्यानंतर खरंच सोनाक्षी सिन्हा आहे गर्भवती? 'दबंग गर्ल' म्हणाली "मला हे सांगायचं आहे की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:32 IST

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यावर्षी 23 जून रोजी लग्न बंधनात अडकले होते.

Sonakshi Sinha Pregnancy Rumour : शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांची लाडकी लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)  ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. सोनाक्षीनं तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) २३ जून २०१४ रोजी  रजिस्टर मॅरेज केलं. सध्या दोघेही वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत. लग्नानंतर सोनाक्षीच्या प्रेग्नेंसीच्या अफवाही अनेकदा समोर आल्या आहेत. आता थेट सोनाक्षीकडून यावर प्रतिक्रिया आलेली आहे.

सोनाक्षी प्रेग्नंट आहे आणि लवकरच ते त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करतील, असे बोललं जात आहे. सोनाक्षी सोशल मीडियावरही चाहते तिला तिच्या प्रत्येक पोस्टवर ती प्रेग्नंट आहे का, असे प्रश्न विचारताना दिसून येतात. आता कर्ली टेल्सशी बोलताना सोनाक्षीनं  प्रेग्नन्सीबद्दल खुलासा केला आहे. सोनाक्षी म्हणाली, "मला सांगायचं आहे की मी प्रेग्नंट नाही. मी फक्त थोडी जाड झाली आहे". थेट सोनाक्षीकडून स्पष्टीकरण आल्यानंतर आता चाहत्यांचा गैरसमज दूर झाला आहे. 

 सोनाक्षी आणि झहीर सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहेत. त्यामुळे अशी गुड न्यूज असल्यास लवकरच ते सोशल मीडियावर जाहीर करतीलच. सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर ४ वेळा हनिमूनला गेली आहे. ती झहीरसोबत सुंदर क्षण घालवत आहे. झहीर आणि सोनाक्षी एकत्र खूप आनंदी आहेत. दोघेही इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. सोनाक्षी आणि जहीरने २०१७ मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. दोघे २०२२ मध्ये 'डबल एक्सएल' चित्रपटात दिसले होते. त्यांनी  रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते.  सोनाक्षी सिन्हा अखेरची संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेबसिरीजमध्ये फरीदानची भूमिका साकारताना दिसली होती. शिवाय, ती रितेश देशमुख आणि साकिब सलीमसोबत काकुडामध्येही दिसली.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाप्रेग्नंसीशत्रुघ्न सिन्हा