अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. 'दबंग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या घराची चर्चा रंगत आहे. सोनाक्षी सिन्हाने मुंबईत सी-फेसिंग फ्लॅट खरेदी केला आहे.
सोनाक्षी नुकतीच नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली असून तिने फ्लॅटची झलक दाखवली आहे. तिने या फ्लॅटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले असून त्याला खास कॅप्शनही दिलं आहे.
व्हिडीओमध्ये सोनाक्षी 4 हजार स्क्वेअर फूट पसरलेल्या आलिशान अपार्टमेंटमध्ये स्वागत करताना दिसत आहे. या अपार्टमेंटमध्ये सोनाक्षीने आर्ट स्टुडिओ, योगा स्पेस तसेच वॉक इन वॉर्डरोबसह 4 बेडरूम बनवले आहेत. सोनाक्षीच्या मते, तिच्या संपूर्ण अपार्टमेंटमधील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तिचे डायनिंग टेबल हा आहे.
सोनाक्षीचे हे घर इंटेरिअर डिझायनर कपल राजीव आणि एकता पारीख यांनी डिझाइन केले आहे. सोनाक्षी सिन्हाने वांद्रे रेक्लेमेशन, रंग शारदा सभागृहाजवळ 81 ओरेटमध्ये 4,200 चौरस फुटांचे सीफेसिंग व्ह्यू अपार्टमेंट हे ११ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
सोनाक्षीपूर्वी अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनीही याच इमारतीच्या 19व्या मजल्यावर अपार्टमेंट खरेदी केले होते. अर्जुनने मे 2022 मध्ये ते अपार्टमेंट 16 कोटी रुपयांना विकले. तर मलायका अजूनही 14.5 कोटी रुपयांच्या अपार्टमेंटची मालकीन आहे. शिवाय, 2022 मध्ये टीव्ही अभिनेता करण कुंद्रानेही याच इमारतीत 14 कोटी रुपयांची अपार्टमेंट खरेदी केली होती.
सोनाक्षी नुकतीच झोया अख्तर आणि रिमा कागतीच्या 'दहाड' वेबसिरीजमध्ये दिसली. यातील तिच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. आता ती आगामी हॉरर कॉमेडी फिल्म 'ककुडा'मध्ये झळकणार आहे.