Join us

अरेरे हे काय? वाढदिवसाच्या दिवशी का ट्रोल होतेय सोनाक्षी सिन्हा?  पाहा भन्नाट मीम्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 17:00 IST

Sonakshi Sinha Birthday : आज सोना तिचा 34 वा वाढदिवस साजरा करतेय. एकीकडे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दुसरीकडे अनेक युजर्स सोनाक्षीची मजा घेताना दिसत आहेत.

ठळक मुद्देसोनाक्षीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती शेवटची सलमान खानच्या 'दबंग ३' या चित्रपटात दिसली होती.

अभिनेते व नेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा ( Sonakshi Sinha) हिचा आज वाढदिवस. आज सोना तिचा 34 वा वाढदिवस साजरा करतेय. एकीकडे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दुसरीकडे अनेक युजर्स आज वाढदिवशीच सोनाक्षीची मजा घेताना दिसत आहेत. होय, ट्विटर बघाल तर सोनाक्षीवरचे अनेक विनोदी मीम्स, जोक्स व्हायरल होत आहेत. अनेकांनी सोनाक्षीला यावरून ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.  ( Sonakshi Sinha Birthday)

आता वाढदिवसाच्या दिवशीच सोना का ट्रोल होतेय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर याचे कारण आहे, सोनाचे ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये येणे. होय, वाढदिवसाच्या निमित्ताने सोनावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. त्यामुळे  ती ट्विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये आली. मात्र काही नेटक-यांना सोनाक्षीचं टॉप ट्रेण्डमध्ये झळकणे आवडले नाही. मग काय, या नेटक-यांनी सोनाक्षी वरचे मीम्स शेअर करण्याचा सपाटा लावला. 

 ट्विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये आल्यानंतर काही वेळेतच सोनाक्षीचे अनेक विदोनी मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होवू लागले.  सोनाक्षी सिन्हा टॉप ट्रेण्डमध्ये येण्यास पात्र नसल्याचे म्हणत अनेकांनी  मीम्स शेअर केलेत. तेव्हा पाहुयात काही मजेदार मीम्स...

टॅग्स :सोनाक्षी सिन्हा