Join us  

बहिणीच्या लग्नात गैरहजर राहण्यावर अखरे सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हाने सोडलं मौन, म्हणाला, "मला एक-दोन दिवस..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 9:51 AM

Sonakshi Sinha Wedding : बहिणीच्या लग्नात सख्खे भाऊ गैरहजर का होते? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आता अखेर याबाबत सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हाने मौन सोडलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी रविवारी(२३ जून) लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि जहीरने रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरचं वेडिंग रिसेप्शन मुंबईत पार पडलं. त्यांच्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले होते. सोनाक्षीच्या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. मात्र, तिचे सख्खे जुळे भाऊ लव आणि कुश लग्नात कुठेच दिसले नाहीत.

सोनाक्षीने रजिस्टर मॅरेज करत जहीरशी रेशीमगाठ बांधली. तिच्या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांनी हजेरी लावली होती. लेकीच्या लग्नात आईवडील भावुक झालेले पाहायला मिळाले. पण, या सगळ्यात सोनाक्षीचे भाऊ मात्र दिसले नाहीत. ना रजिस्टर मॅरेज करताना ना वेडिंग रिसेप्शनला. वेडिंग एन्ट्रीलाही झालर पकडताना तिचे भाऊ गायब होते. बहिणीच्या लग्नात सख्खे भाऊ गैरहजर का होते? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आता अखेर याबाबत सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हाने मौन सोडलं आहे. 

हिंदुस्तान टाइम्सशी बातचीत करताना लवने बहिणीच्या लग्नाला गैरहजर राहण्यामागचं कारण सांगितलं. तो म्हणाला, "कृपया मला एक-दोन दिवसांचा वेळ द्या. जर मला वाटलं की मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेन तर खरंच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. विचारल्याबद्दल धन्यवाद". 

सोनाक्षीला जुळे भाऊ आहेत. त्यांची नावं लव आणि कुश अशी आहेत. तर सिन्हा कुटुंबाच्या बंगल्याचं नाव 'रामायणा' आहे. सोनाक्षीने आंतरधर्मीय विवाह केल्याने अनेकजण तिला ट्रोल करत आहेत. इतकंच नाही तर तिच्या लग्नावरुन कुटुंबातील लोकांमध्येच नाराजी पाहायला मिळतेय.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हासेलिब्रेटी वेडिंग