Join us

Sonakshi Sinha Wedding: जहीरशी लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्मपरिवर्तन करणार? होणाऱ्या सासऱ्यांनीच दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 12:38 PM

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी आंतरधर्मीय विवाह करत असल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

बी टाऊनमध्ये सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इकबाल यांच्या लग्नाची चर्चा आहे. सुरुवातीला शत्रुघ्न सिन्हा या लग्नाला राजी नसल्याचंही बोललं जात होतं. मात्र दोन दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंब एकत्र आले तेव्ह त्यांच्यात सगळं आलबेल असल्याचं समोर आलं. दरम्यान सोनाक्षी आंतरधर्मीय विवाह करत असल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. लग्नानंतर ती धर्मपरिवर्तनही करणार का हे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नावर जहीरचे वडील रतनसी इकबाल यांनी उत्तर दिलं आहे.

रतनसी इकबाल यांनी सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नावर पहिल्यांदाच माध्यमांसमोर भाष्य केलं. फ्री प्रेस जर्नलशी बातचीत करताना ते म्हणाले, "सोनाक्षी धर्म बदलणार नाही हे तर निश्चित आहे. दोघंही मनाने जोडले गेले आहेत. यामध्ये धर्माचा प्रश्नच येत नाही. माझा केवळ माणूसकीवर विश्वास आहे. हिंदू लोक देवाला मानतात तर मुस्लिम अल्लाह. पण शेवटी आपण सगळेच आधी माणूस आहोत. माझा आशीर्वाद जहीर आणि सोनाक्षीसोबत कायम आहे."

रतनसी इकबाल हे मुंबईतील दागिन्यांचे व्यापारी आहेत. याशिवाय रिअल इस्टेट आणि मनोरंजनविश्वातही त्यांची गुंतवणूक आहे. 2005 साली त्यांनी रियल इस्टेट कंपनी सुरु केली. 2011 पर्यंत ते कंपनीचे संचालक होते. यानंतर त्यांनी आणखी २ कंपन्या सुरु केल्या आणि बरेच पैसे कमावले. कोरोना काळात त्यांनी मीडिया आणि इंटरनेट कंपनी सुरु केली. दबंग अभिनेता सलमान खानचे ते खास मित्र आहेत. तो त्यांना 'पर्सनल बँक' म्हणतो. रतनसी यांनी सलमानला 2011 रुपये उधार दिले होते जे सलमानने आजपर्यंत परत दिलेले नाहीत. हे सलमानने स्वत:च ट्वीट करत सांगितलं होतं. 

टॅग्स :जहीर इक्बालसोनाक्षी सिन्हालग्नबॉलिवूडहिंदूमुस्लीम