Join us  

सोनाक्षी सिन्हा जस्टिन बीबरसोबत करणार नाही परफॉर्मन्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2017 5:14 PM

जगभरातील तरुणांच्या हृदयाची धडकन असलेला पॉप गायक जस्टिन बीबर याच्यासोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा परफॉर्मन्स करणार की नाही याविषयीच्या सस्पेन्सचा ...

जगभरातील तरुणांच्या हृदयाची धडकन असलेला पॉप गायक जस्टिन बीबर याच्यासोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा परफॉर्मन्स करणार की नाही याविषयीच्या सस्पेन्सचा आता उलगडा झाला आहे. येत्या १० मे रोजी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर जस्टिनच्या लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले आहे. यावेळी सोनाक्षी जस्टिनसोबत परफॉर्मन्स करणार असल्याची बातमी पुढे आली होती. मात्र आता या बातमीला दस्तुरखुद्द सोनाक्षी सिन्हानेच नकार दिला असून, ती आता जस्टिनसोबत परफॉर्मन्स करणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. एबीबी न्यूजशी बोलताना सोनाक्षीने म्हटले की, चित्रपटाच्या व्यस्ततेमुळे मी जस्टिन बीबरसोबत परफॉर्मन्स करू शकणार नाही. मात्र स्टेडियममध्ये उपस्थित राहून जस्टिनची कॉन्सर्ट एन्जॉय करण्याची तिची इच्छा असून, कॉन्सर्ट उपस्थित राहण्यासाठी ती पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही तिने सांगितले आहे. त्यामुळे सोनाक्षी जस्टिनसोबत परफॉर्मन्स करणार नाही, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान गेल्या महिन्याच्या २२ तारखेला ‘नूर’ या चित्रपटातील ‘गुलाबो २.०’ या गाण्याच्या लॉन्चिगप्रसंगी सोनाक्षीने म्हटले होते की, जस्टिनसोबत परफॉर्मन्स करण्यासाठी ती उत्सुक आहे. मात्र अद्यापपर्यंत याबाबत स्पष्ट झाले नसल्याने माझे प्रयत्न सुरू असल्याचे तिने म्हटले होते. त्यामुळे सोनाक्षी जस्टिनसोबत परफॉर्मन्स करणार हे जवळपास स्पष्ट समजले जात होते. मात्र आता आलेल्या माहितीनुसार सोनाक्षी जस्टिनसोबत परफॉर्मन्स करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.