Join us

​सोनाक्षीचा ‘आॅस्सम’ लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2016 9:47 AM

तिने अबू जानी आणि संदीप खोसला या डिझायनर्सने तयार केलेला ड्रेस घालून रेड कार्पेटवर छायाचित्रकारांना पोझ दिली.

सोनाक्षी सिन्हा आपल्या पेहरावाबद्दल खूप काळजी घेत असते. आपल्या लूकवर ती अ‍ॅक्टिंग एवढीच मेहनत घेते.विविध डिझायनर्ससोबत काम करून ती स्वत:साठी खास वॉर्डरोब तयार करते. आणि जर रेड कार्पेटवर जायचे असेल तर ती महिनाभर आधाीपासून तयारी सुरू करते.तिची ही मेहनत यंदाच्या आयफा पुरस्कारामध्येही दिसली. तिने अबू जानी आणि संदीप खोसला या डिझायनर्सने तयार केलेला ड्रेस घालून रेड कार्पेटवर छायाचित्रकारांना पोझ दिली.सेलिब्रेटी स्टायलिस्ट आलिया अल रुफाईने तिच्यासाठी स्पेशल दागिने बनवले. तिचा एकूण लूक पाहता सोनाक्षी एकदम सुंदर दिसते यात काही शंकाच नाही.सोनाक्षी लवकरच ‘अकिरा’ या ए. आर. मुरगॉडॉस दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे. स्त्रीप्रधान या चित्रपटात सोनाक्षी जबरदस्त अ‍ॅक्शन करणा आहे. नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला आहे.