Join us

Birthday Special : सोनाली बेंद्रे पडली होती या अभिनेत्याच्या प्रेमात, पण व्यक्त करू शकली नाही प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 19:00 IST

सोनाली गोल्डीसोबत लग्न करण्याआधी एका अभिनेत्याच्या प्रेमात होती. पण सोनाली अखेरपर्यंत हे प्रेम व्यक्त करू शकली नाही आणि ही प्रेमकहाणी सुरू होण्याआधीच संपली.

ठळक मुद्देसुनील आणि सोनालीने टक्कर, सपूत, कहर, भाई अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले होते. या चित्रपटांच्या सेटवर सोनाली सुनीलवर फिदा झाली होती.

आज सोनाली बेंद्रेचा वाढदिवस आहे. मराठी कुटुंबात जन्मलेल्या सोनालीने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केले. 90 च्या दशकातील सर्वाधिक सुंदर, प्रतिभावान आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सोनालीने अनेक हिट सिनेमे दिलेत. तिने सरफरोश, दिलजले, रक्षक, जख्म, हम साथ साथ है यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2002 मध्ये सोनालीने दिग्दर्शक गोल्डी बहलसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नानंतर ती खूपच कमी चित्रपटांमध्ये काम केले. २०१८ मध्ये सोनालीला कॅन्सरचा सामना करावा लागला होता. कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी सोनाली न्यूयॉर्कला गेली होती. कॅन्सर झाल्याची माहिती देखील तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. पण काहीच महिन्यात तिने या आजारावर मात केली.

तुम्हाला माहीत आहे का, सोनाली गोल्डीसोबत लग्न करण्याआधी एका अभिनेत्याच्या प्रेमात होती. पण सोनाली अखेरपर्यंत हे प्रेम व्यक्त करू शकली नाही आणि ही प्रेमकहाणी सुरू होण्याआधीच संपली. हा अभिनेता दुसरा कोणी नाही तर सुनील शेट्टी आहे. सुनील आणि सोनालीने टक्कर, सपूत, कहर, भाई अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले होते. या चित्रपटांच्या सेटवर सोनाली सुनीलवर फिदा झाली होती. मनातल्या मनात सुनीलवर ती प्रेम करू लागली. पण तिने कधीच या प्रेमाची कबुली दिली नाही. याचे कारण म्हणजे, सुनील विवाहित होता.

सोनालीला सुनीलचा संसार उद्धवस्त करायचा नव्हता आणि त्यामुळेच सुनीलबद्दलच्या भावना तिने कधीच व्यक्त केल्या नाहीत. पण तिच्या या भावनांविषयी सुनीलला माहीत होते. एकदा अभिनेता गोविंदाने एका मुलाखतीत सोनाली आणि सुनीलच्या या अव्यक्त प्रेमाबद्दल सांगितले होते. सुनील शेट्टी विवाहित नसता तर त्याने सोनालीबद्दल विचार केला असता, अशी कबुली गोविंदाने या मुलाखतीत दिली होती. 

टॅग्स :सोनाली बेंद्रेसुनील शेट्टी