Join us

सोनाली बेंद्रेचे हे फोटोशूट देईल प्रत्येक कॅन्सर पीडिताला प्रेरणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 2:00 PM

सोनालीने एका जगप्रसिद्ध मॅगझिनसाठी फोटोशूट केलेय. या फोटोशूटच्या प्रत्येक फोटोत सोनालीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे.

ठळक मुद्देसर्जरीला जाताना माझ्या बहिणीने मला घट्ट मिठी मारली. तो क्षण माझ्यासाठी प्रचंड वेदनादायी होता. सुदैवाने ती सर्जरी यशस्वी झाली आणि मी जिवंत परतले, हे सांगताना सोनालीच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

सोनाली बेंद्रे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी लढतेय. सोनाली ज्या धीराने आणि संयमाने या आजाराला सामोरी गेली, ते निश्चितपणे प्रेरणादायी आहे. कॅन्सर झाल्याची माहिती सोनाली स्वत: सोशल मीडियावर शेअर केली. यानंतर उपचारादरम्यानचे अनेक चढऊतार, भावना-भावनाही तिने खुलेपणाने सोशल मीडियावर मांडल्या. आता सोनालीने एका जगप्रसिद्ध मॅगझिनसाठी फोटोशूट केलेय. या फोटोशूटच्या प्रत्येक फोटोत सोनालीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे.

कॅन्सरवरील उपचारादरम्यान सोनालीने आपले केस गमावले. पण सोनालीला याचा जराही पश्चाताप नाही. फोटोशूटसोबत दिलेल्या मुलाखतीत सोनाली यावर बोलली. विग घालणे, कॅप लावणे वा स्कार्फ बांधणे याचा मला तिटकारा येतो. उपचारादरम्यान मला माझ्या केसांचे बलिदान द्यावे लागणार, हे मला ठाऊक होते. त्यामुळे मी मुंडण केले आणि ते फोटो सोशल मीडियावर शेअरही केलेत. याने मनात एका वेगळ्याच समाधानाची, धीराची भावना निर्माण झाली, असे सोनालीने या मुलाखतीत सांगितले.

मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये सोनालीने हेअरबँड, पर्ल नेकलेस व स्वेट शर्ट कॅरी केला आहे. अलीकडे एका ताज्या मुलाखतीत सोनालीने कॅन्सरच्या प्रवासाबद्दल सांगितले होती. कॅन्सरला कशी सामोरी गेलीस, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना सोनाली कमालीची भावूक झाली होती.

कॅन्सरचे निदान हा माझ्यासाठी धक्का होता. पुढचा प्रवास कसा असेल, या विचाराने माझी तहान-भूक हरवली होती. या आजारासाठी मीच जबाबदार आहे, असा विचार करून करून मी दिवसरात्र रडायचे. स्वत:ला दोष द्यायचे. न्यूयॉर्कमध्ये उपचारासाठी गेल्यावर मानसोपचार तज्ज्ञाने ने मला यातून मला बाहेर काढले. उपचारादरम्यान माझ्यावर एक मोठी सर्जरी करावी लागणार होती. यातून मी वाचेल की नाही, याचीही शाश्वती नव्हती. माझ्या मुलाला मी पुन्हा पाहू शकेल की नाही, हीही शाश्वती नव्हती. सर्जरीला जाताना माझ्या बहिणीने मला घट्ट मिठी मारली. तो क्षण माझ्यासाठी प्रचंड वेदनादायी होता. सुदैवाने ती सर्जरी यशस्वी झाली आणि मी जिवंत परतले, हे सांगताना सोनालीच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

टॅग्स :सोनाली बेंद्रे